Weather Forecast | दिवाळीनंतर राज्यामध्ये थंडीची चाहूल लागली असून उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 13 अंशापर्यंत खाली घसरल्याने गारठ्यात वाढ झाली आहे. तर उर्वरित राज्यात मात्र थंडीची प्रतीक्षा कायम आहे. आज रविवार दि. 10 नोव्हेंबर रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निच्चांकी १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार असून राज्यातील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
Weather Update | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता
कोकणात उन्हाचा कडाका कायम
नैऋत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे या भागात मंगळवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. तर या प्रणालीपासून पूर्व माध्यम बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दरम्यान, कोकणात उन्हाचा चटका जाणवत असला तरी उर्वरित राज्यात कमाल तापमानात घट झाली आहे. राज्याच्या उत्तरेकडे जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा घसरला असून मध्य महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी गारठा वाढत चालला आहे. तर राज्याच्या कमाल व किमान तापमानात तफावत जाणवत आहे. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात घट झाली असली तरी थंडीची प्रतीक्षा कायम आहे.
Weather Update | अखेर प्रतिक्षा संपली; राज्यात थंडीचे आगमन
राज्याच्या कमाल व किमान तापमानात चढ-उतार
रविवार दि. 10 नोव्हेंबरच्या 24 तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 35.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रुज येथे कमाल 35 तापमान अंशाच्या पुढे नोंदवले गेले. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, निफाड, नाशिकसह जळगाव येथे तापमानाचा पारा 15 अंशाच्या खाली घसरला असून महाबळेश्वर, अहिल्यानगर, पुणे येथे किमान तापमान 16 वर्षाच्या खाली आहे. तर आज दि. 11 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार असून राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. (Weather Forecast)