Weather Forecast | राज्यामध्ये थंडी वाढली असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हुडहुडी भरली आहे. धुळे आणि निफाड येथे किमान तापमानाचा परा 10 अंशापर्यंत घसरला असून आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी तापमानातील घट कायम राहणार असून गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Weather Update | राज्यातील तापमानात घट कायम; उत्तरेकडील वाऱ्यांमुळे गारठा वाढला
बहुतांश ठिकाणी किमान तापमान 15 अंशाखाली
कोमोरीन भागात असलेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून अग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्याला चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे देशाच्या सपाट भूभागावर नीचांकी 8.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात देखील गारठा वाढला असून गुरुवारी धुळे येथील कृषी महाविद्यालय व निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील सर्वात नीचांकी म्हणजेच 10.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमान 15° खाली घसरले असून राज्यात खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात झाली आहे. आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी किमान तापमानातील घट कायम राहून राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अंदमान समुद्रात उद्यापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र
तसेच दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून या प्रणालीच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. तसेच ही प्रणाली वायव्य व उत्तर दिशेकडे सरकताना अधिक तीव्र होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
Weather Forecast | उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी; पुण्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद
राज्यांमधील नीचांकी तापमान असलेली ठिकाणे
परभणी येथे 11 अंश सेल्सियस, निफाड 10.5, धुळे 10.5, पुणे 12.2, नाशिक 12.4, अहिल्यानगर 12.3, जळगाव 13, महाबळेश्वर 12.5. (Weather Forecast)