Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात थंडीची चाहूल; आज किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता


Weather Forecast | राज्यात कमाल व किमान तापमान कमी- अधिक होत असून विदर्भ व कोकणात उन्हाचा कडाका कायम आहे. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पहाटे गारवा तर दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्याच्या तापमानात आज दि. 6 नोव्हेंबर रोजी चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Weather Forecast | नोव्हेंबर महिन्यात देखील उन्हाच्या झळा; गुलाबी थंडीची प्रतिक्षा कायम

कमाल व किमान तापमानातही चढ-उतार सुरू

अरबी समुद्रात दक्षिण मध्य भागात समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत मानारच्या आखाता चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आकाश निरभ्र झाले आहे. तसेच कमाल व किमान तापमानातही चढ-उतार सुरू आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सांताक्रुज येथे राज्यातील उच्चांकी 35.5°c तापमानाची नोंद झाली असून अमरावती, अकोला, रत्नागिरी, डहाणू येथे 35 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.

राज्याच्या उत्तर भागात गारवा

राज्याच्या उत्तर भागात किमान तापमानात घट होत असून निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निच्चांकी 15.5°c तापमानाची नोंद झाली आहे. तर उत्तरेकडे पहाटे गारवा वाढला असला तरी देखील राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये थंडीची प्रतीक्षा कायम आहे.

Weather News | दिवाळीनंतर देखील राज्यात अवकाळी चे संकट कायम; कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा!

मंगळवार 5 नोव्हेंबरपर्यंत नोंदवले गेलेले कमाल व किमान तापमान:

कोल्हापूर ३१.३ (२०.६), पुणे ३१.६ (१७.६), जळगाव – (१६.०), अहिल्यानगर ३१.० (१७.३), मालेगाव ३१.० (१८.२), नाशिक ३१.८ (१६.७), महाबळेश्वर २६.५ (१६.६), सोलापूर ३४.८ (२२.०), सांगली ३२.७ (१९.५), सांताक्रूझ ३५.५ (२२.८), सातारा ३१.४ (१८.६), रत्नागिरी ३५.२ (२३.०), बीड ३२.०, डहाणू ३५.४ (२२.३), नांदेड (१८.८), छत्रपती संभाजीनगर ३२.३ (१७.४), चंद्रपूर ३३.४ (१९.२), ब्रह्मपुरी ३४.३ (१९.८), अमरावती ३५.२ (१९.८), परभणी ३२.७ (२०.३), अकोला ३५.१ (२०.४), यवतमाळ ३३.२ (१९.०), नागपूर ३३.४ (१७.४), गोंदिया ३३.४ (१७.४), गडचिरोली ३३.० (१९.२), बुलडाणा ३१.६ (१९.२), वर्धा ३३.४,वाशीम ३४.४. (Weather Forecast)