Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांदवड येथील बाजार समितीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता सभा घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यास योग्य हमीभाव दिला जाईल असे म्हणत आश्वासनही दिले.
Mallikarjun Kharge | ‘सोयाबीनला 7 हजार रु. हमीभाव देणार!’; मल्लिकार्जुन खरगेंचे आश्वासन
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी “हा देश शेतकऱ्यांच्या मेहनतीवर उभा आहे. अन्नदात्याला जो दुखावणारा सत्तेत बसू शकणार नाही. आज भ्रष्टाचार, महागाई वाढली असून त्या तुलनेत शेतीमालाला भाव नसल्याने देशाचा पोशिंदा असणारा शेतकरी कर्जात बुडून गेला आहे. शेतकऱ्यांना वाचवण्याकरिता महाविकास आघाडी सोयाबीन, कपाशीला 7 ते 10 हजार रुपये क्विंटल हमीभाव देण्यात येईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले जाईल.” अशी घोषणा केली आहे.
Agro News | वाढत्या महागाईत चोरट्यांचा लसणावर डल्ला; पंचवटी बाजारातून साडेतीन लाखांचा माल चोरीला
तुमच्याकडे लोकसभेची पुनरावृत्ती करण्याची संधी
त्याचबरोबर त्यांनी, महायुतीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधत “या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. जेव्हा कांदा बाजारात विक्रीला येतो आणि त्याला भाव मिळत नाही. व जेव्हा शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसतो, त्यावेळेला कांद्याला भाव मिळतो. हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे.” असा घणाघात यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला. “लोकसभेवेळी कांद्याने सत्ताधाऱ्यांचा वांदा केलाळ होता. याची पुनरावृत्ती करण्याची संधी तुमच्याकडे आहे.” असे देखील म्हटले आहे. (Supriya Sule)