Soybean Rate | सोयाबीनच्या आवकेत वाढ कायम; भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी


Soybean Rate | दिवाळीनंतर देशातील बाजारपेठात सोयाबीनच्या आवाकीत कमालीची वाढ झाली असून महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये आवकेने उंची गाठली आहे. परिणामी सोयाबीनला भाव मिळत नसून दुसरीकडे कापूसालाही कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

Soybean News | हमीभाव जाहीर करूनही सोयाबीन उत्पादक तोट्यात; कमी दरामुळे होतेय आर्थिक नुकसान

दिवाळी दरम्यान शेतकऱ्यांचा सोयाबीन वाळवण्यावर भर

यावर्षी सोयाबीनची लागवड दोन ते तीन आठवडे उशिरांनं झाली असल्यामुळे काढणी ही काहीशी उशिरा झाली. यामुळे बाजारात सोयाबीनच्या आवक वाढण्याला काहीसा उशीर झाला. त्यात दिवाळीमुळे बाजार समित्या बंद होत्या वाढणीच्या काळात झालेल्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले. सोयाबीनमध्ये ओलावा जास्त असल्यामुळे दिवाळीत शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री काहीशी कमी करत सोयाबीन वाळवण्यावर भर दिला होता.

देशभरात सोयाबीनच्या आवाकेत वाढ

दिवाळीनंतर मात्र सोयाबीनची आवक वाढण्यास सुरुवात झाली. सध्या सोयाबीनची आवक शिगेला पोहोचली असून देशाच्या महत्त्वाच्या म्हणजेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. मध्य प्रदेश मधील इंदोर, निमच, देवास, बाडनगर, उज्जैन या बाजारात सोयाबीनचे आवक शिगेला पोहोचली आहे. या बाजारांमध्ये रोज 10 हजार क्विंटल पेक्षा जास्त सोयाबीन येत आहे. त्याचबरोबर, राज्यातील बहुतांश बाजारपेठांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असून अमरावती, लातूर, वाशिम, जालना, हिंगणघाट बाजारात आवक जास्त होत आहे. लातूरच्या बाजारात देखील 30 हजार क्विंटलच्या घरात आवक पोहोचली आहे. तर इतर बाजारांमध्ये 10 हजार क्विंटल इतकी आवक होत आहे. त्याचबरोबर सोयाबीनमधील ओलाव्याच्या प्रमाणातही काही प्रमाणात घट झाल्यामुळे बाजारात जास्त आवक होऊ लागली आहे.

Soybean Rate | बार्शी बाजार समितीत सोयाबीनचे दर गडगडले; दिवाळीनंतर दरात घसरण सुरूच

आवकेत आणखीन वाढ होण्याची शक्यता

दरम्यान, सोयाबीन काढणीनंतर राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू होती. ज्यामुळे बाजारातील व्यवहारावरही काही प्रमाणात परिणाम झाला, व्यवहार थंडावले असल्यामुळे रणधुमाळी संपताच पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीनची आवक वाढण्याचा अंदाज आहे. (Soyabean Rate)