Soybean Rate | सोयाबीनच्या दराचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात चर्चेचा विषय ठरला. तसेच नेत्यांकडून सोयाबीनच्या दरावरून राजकारण होताना दिसले. त्यामुळे आता याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडून हमीभावाने खरेदीसाठी सोयाबीन मधील ओलावा 12 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर बाजारभावात सुधारणा होत, 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे.
Soybean Rate | बार्शी बाजार समितीत सोयाबीनचे दर गडगडले; दिवाळीनंतर दरात घसरण सुरूच
शेतकऱ्यांचे क्विंटलमागे एक हजार ते पंधराशे रुपयांचे नुकसान
अमरावती बाजार समितीत गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत दोन लाख 88 हजार क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून सोयाबीनला 4,892 हा दर जाहीर करूनही ऑक्टोबरच्या सुरुवातीला बाजारात सोयाबीनची 3,200 ते 3,800 या दराने विक्री होत होती. ज्यामुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे एक हजार ते पंधराशे रुपयांचे नुकसान होत होते. अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष होतासोयाबीनला 3,800 ते 4,000 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळू लागला असून या व्यवहारात देखील शेतकऱ्यांना 800 ते 1000 रुपयांचे नुकसान होत होते. तर अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून याचा फटका राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला बसण्याची दाट शक्यता होती. यामुळे सोयाबीनचे दर सुधारण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडच्या खरेदी केंद्राची संख्या पाठवली व ओलाव्याचे प्रमाणही 12 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणले.
अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता
सोयाबीनला 3,800 ते 4,000 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळू लागला असून या व्यवहारात देखील शेतकऱ्यांना 800 ते 1000 रुपयांचे नुकसान होत होते. तर अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून याचा फटका राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला बसण्याची दाट शक्यता होती. यामुळे सोयाबीनचे दर सुधारण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडच्या खरेदी केंद्राची संख्या पाठवली व ओलाव्याचे प्रमाणही 12 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणले.
Soybean Rate | बार्शी बाजार समितीत सोयाबीनचे दर गडगडले; दिवाळीनंतर दरात घसरण सुरूच
आगामी काळात बाजारभावात आणखीन वाढ होण्याची शक्यता
यामुळे बाजारभावावर सकारात्मक परिणाम दिसून येत असून एकाच दिवसात प्रतिक्विंटल 200 ते 300 रुपये अशी वाढ नोंदविण्यात आली आहे. तर अमरावती बाजार समिती शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सोयाबीनला 4,000 ते 4,300 असा दर मिळाला असून या पुढील काळात सोयाबीन दरात आणखीन सुधारणा होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे. (Soyabean Rate)