Soybean Rate | एकीकडे राज्यभर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. दुसरीकडे बाजारभावात होणाऱ्या चढ उताऱ्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची घट झाली आहे.
Soybean Rate | लातूरमध्ये आवक वाढल्याने सोयाबीनच्या दरात घट
दिवाळीनंतर दररोज शंभर ते दोनशे रुपयांनी दरात गट
यावर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी सोयाबीनला उतार चांगला असून बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळी आधी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर झालेल्या सौद्यामध्ये सोयाबीनला 4,000 ते 4,450 पर्यंत भाव मिळाला होता. पाडव्याच्या दिवशी सोयाबीनची 4,450 रु. प्रतिक्विंटल दरावर विक्री झाली. परंतु त्यानंतर तीन-चार दिवसांतच दररोज 100 ते 200 रुपयांनी दरात घट झाली आहे.
Soybean Rate | सिन्नरमध्ये आधारभूत किमतीत सोयाबीनची खरेदी सुरू; काय मिळाला दर? वाचा सविस्तर
बाजारात दररोज 6 ते 7 हजार कट्टे सोयाबीनची आवक
मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सोयाबीनचे दर 4,150 रुपयावर स्थिर झाले असून 3,600 रु. पासून मालाप्रमाणे 4,150 रुपयांपर्यंत भाव मिळत आहेत. तर बाजारात दररोज 6 ते 7 हजार कट्टे सोयाबीनची आवक होत आहे. भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात न आणता सोयाबीनला घरीच ठेवणे पसंत केले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी मधल्या काळात पाऊस असल्याने व शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने सोयाबीन काढून शेतात तसेच ठेवले आहे. याचबरोबर डीओसीच्या दरातही घसरण झाल्यामुळे सोयाबीनचे भाव घटले असल्याचे सोयाबीन खरेदीदारांनी सांगितले आहे. (Soybean Rate)