Soybean Rate | लातूरमध्ये आवक वाढल्याने सोयाबीनच्या दरात घट


Soybean Rate | लातूर जिल्ह्यातील अडत बाजारात सोयाबीनची आवक वाढली असून दरात घसरण झाली आहे. त्यानंतर आवक कमी झाली असून शेतकऱ्यांना आता भाववाढीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दुसरीकडे सरकारने सुरू केलेल्या आधारभूत केंद्रावर अजूनही खरेदीला उत्साह आलेला नसून बारदाना असूनही मॉइश्चरचे प्रमाण जास्त असल्याने खरेदी मंदावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Soybean Rate | सिन्नरमध्ये आधारभूत किमतीत सोयाबीनची खरेदी सुरू; काय मिळाला दर? वाचा सविस्तर

शेतकऱ्यांना आहे त्या किमतीत करावी लागतेय विक्री

अशा परिस्थितीत तातडीने आर्थिक गरज भागवण्यासाठी शेतकऱ्यांना आहे त्या किमतीत सोयाबीनची विक्री करावी लागत असून चार दिवसांपूर्वी बाजारात असलेल्या सोयाबीनचा कमाल 4,565 रुपये क्विंटलचा भाव गुरूवार दि. 7 रोजी 4,290 रुपयांवर आला आहे. सोयाबीनची काढणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला सुरुवात केली असून चांगला पाऊस झाल्याने शेतकरी ऊस लागवडीलाही प्राधान्य देत आहेत. रब्बीची पेरणी व ऊस लागवडीचा खर्च भागवण्याकरिता सोयाबीनची काढणी होताच शेतकऱ्यांनी विक्रीकरिता सोयाबीन बाजारात आणायला सुरुवात केली आहे. यातून दिवाळ सणानंतर सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सोयाबीनची विक्रमी 49 हजार 11 क्विंटलची आवक झाली.

त्यादिवशी कमाल 4,565 तर किमान 3,900 रुपये भाव होता. यानंतर मात्र, भावात घसरण झाली व सोयाबीनची आवकेतही घट होऊ लागली. मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी 48 हजार 551 क्विंटल तर बुधवारी दिनांक ६ नोव्हेंबर रोजी 45 हजार 540 क्विंटल आवक झाली होती. दोनही दिवशी सोयाबीनला कमाल 4,350 तर किमान 3,900 रुपये दर मिळाला.

Soyabean Rate | सोयाबीनच्या आवकेमध्ये 23 टक्क्यांनी वाढ; दरातील घसरण कायम

गरजेपाई शेतकरी हतबल

तर गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी भाव वाढीची आशा असतानाच त्यात कमाल 4,290 तर 3,837 असा भाव मिळाला गुरुवारी 34 हजार 983 क्विंटल आवक होती. दरम्यान, जिल्ह्यात 14 केंद्रांवर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होऊन देखील त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. तर सोयाबीन विक्रीसाठी आतापर्यंत 15 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करून देखील प्रत्यक्षात सोयाबीनमध्ये मॉइश्चरचे प्रमाण जास्त असल्याने त्याची केंद्रावर खरेदी होताना दिसत नाही. यामुळे तातडीच्या गरजा भागवण्याकरिता शेतकरी हतबल झाले असून त्यांना बाजारात मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करण्या फेरीस पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे. (Soybean Rate)