Soybean News | हमीभाव जाहीर करूनही सोयाबीन उत्पादक तोट्यात; कमी दरामुळे होतेय आर्थिक नुकसान


Soybean News | केंद्र शासनाकडून हमीभावाने सोयाबीन खरेदीची घोषणा करण्यात आली. परंतु केंद्रे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. यावर्षीच्या हंगामासाठी केंद्राने सोयाबीनला 4,892 रुपये प्रतिक्विंटल हा दर जाहीर केला असून शेतकऱ्यांवर यापेक्षा कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ आली आहे.

Soybean Rate | बार्शी बाजार समितीत सोयाबीनचे दर गडगडले; दिवाळीनंतर दरात घसरण सुरूच

शासनाची विक्री केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची अडचण

यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पीक चांगले येणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र परतीच्या पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. सध्या शेतकऱ्यांना पैशांच्या अडचणी पाई बाजारपेठेत सोयाबीनच्या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर यंदा केंद्र सरकारने सोयाबीनची 4,892 रुपये प्रतिक्विंटल ही किमान आधारभूत किंमत निश्चित करून राज्यात 90 दिवसांसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता दिली. परंतु अद्याप ही खरेदी केंद्र सुरू झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांची पुरती अडचण होत आहे.

योग्य हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

दरम्यान, व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची प्रत पाहून 3,000 पासून 4,200 रुपये दराने प्रतिक्विंटल खरेदी केली जात असून शेतकऱ्यांना कात्रित पकडून त्यांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न व्यापारी करत आहेत. केंद्र सरकारने पिकाला किमान 4,892 प्रतिक्विंटल हा हमीभाव जाहीर केला असून त्याबरोबर केंद्र सरकारने 90 दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यास मान्यता दिली व कोणीही किमान हमीभावापेक्षा कमी रकमेत सोयाबीन खरेदी करू नये असा कायदा केला आहे.

Soybean Rate | बार्शी बाजार समितीत सोयाबीनचे दर गडगडले; दिवाळीनंतर दरात घसरण सुरूच

मात्र शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून बाजारपेठेत विकायला आणले तेव्हा सरकारी हमीभाव केंद्रे सुरू नसल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांकडे सोयाबीनची विक्री करण्याशिवाय पर्याय उरला नाही. आज बाजारपेठेत सोयाबीनला 3 हजारांपासून 4,200 प्रतिक्विंटल असा दर व्यापाऱ्यांकडून दिला जात असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. (Soybean News)