Soyabean, Cotton Rate | सध्या कापसाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आज दिनांक 22 नंबर रोजी सेलू बाजारात लांब, स्टेपल कापसाची कापसाची 910 क्विंटल आवक झाली असून किमान 7000 रुपये तर कमाल 7,150 रुपयाचा दर मिळाला आहे.
Cotton Rate | पहिल्या वेचणीतील ओला कापुस विक्रीकरिता बाजारात; काय मिळाला दर.. वाचा सविस्तर
काय मिळाला कापसाला दर?
पणन मंडळाच्या माहितीनुसार, वर्धा बाजार समितीत मध्यम स्टेपल कापसाला 7,050 किमान तर 7,325 असा सरासरी दर मिळाला. बार्शीटाकळी बाजारात 7471 रुपये तर, पारशिवनी बाजारात एच4 मध्यम स्टेपल कापसाला 6850 रु. किमान तर 6950 रु. असा कमाल दर मिळाला. पुलगाव बाजारात किमान 6,800 तर सरासरी 7,025 असा दर मिळाला. उमरेड बाजारात किमान 6,800 तर सरासरी 6,950 असा दर मिळाला. लोकल कापसाला 7,321 रुपये किमान तर सरासरी 7,396 रु. असा सरासरी दर मिळाला असून कटोल बाजारात किमान 6,900 तर सरासरी 4,000 रुपये असा दर मिळाला.
बाजारात सोयाबीनची आवक घटली
तसेच आज सोयाबीनची 48,166 क्विंटल आवक झाली असून त्याला सर्वसाधारण 4,039 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. दरम्यान सध्या बाजार समितीत सोयाबीनची आवक घटल्याचे चित्र आहे. आज 22 नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये लोकल, हायब्रीड, पांढरा, पिवळा या जातीच्या सोयाबीनची आवक झाली असून लातूर बाजारात पिवळ्या जातीच्या सोयाबीनची 19 हजार 180 क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली आहे. त्याला किमान 4,100 रु. प्रतिक्विंटल असा दर मिळाला असून 4,400 रु. प्रतिक्विंटल इतका कमाल दर मिळाला आहे. तर 4,300 प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर मिळाला.
Soybean Rate | सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा; आगामी काळात बाजारभाव वाढण्याची शक्यता
वैजापुरात सोयाबीनची सर्वात कमी आवक
वैजापूरच्या शिरूर बाजार समितीत पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वात कमी आवक झाली असून 1 क्विंटल आवक झाली आहे. तर त्याला सर्वसाधारण 3,800 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. (Soyabean, Cotton Rate)