Rain Update : मागील दोन दिवसांपसून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर, मागील दोन दिवसांपासून मुंबईत संततधार सुरू असून, रस्ते, रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी सुखावले आहे. तर, धरणांचीही पाणी पातळी वाढल्याने शहरी नागरिकांनाही दिलासा मिळाला असून, पाणी कपातीचे संकट टळले आहे. पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तर, मुंबईत आज दुपारी समुद्राला भरती येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. (Rain Update)
Rain Update | शेतकऱ्यांनो सावधान! राज्यात पुन्हा अवकाळी बरसणार
Rain Update | उत्तर महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती काय
पुढील २४ तास हे कोकण आणि पश्चिम किनारपट्टीतील जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहे. तसेच, हवामान विभागाने आज राज्यातील ९ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, रत्नागिरी व गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही माध्यम स्वरूपातील पावसाचा अंदाज असून, येत्या दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
हवामान विभागाकडून ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, नागपूर, अमरावती या ९ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, संपूर्ण मराठवाडा, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रालाही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)
Rain Update | यंदा शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यातही चांगल्या पावसाचा अंदाज
मुंबईत आज समुद्राला भरती
आज दुपारच्या सुमारास मुंबईत समुद्राला भरती येणार आहे. यादरम्यान समुद्रात 4.24 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मुंबईत पाण्याचा निचरा होणे कठीण होईल आणि यामुळे पुन्हा मुंबई तुंबण्याची शक्यता आहे. तसेच सखल भागांत पाणी साचून जनजीवन विस्कळीत होऊ शकते.