Rain News | राज्यातील बहुतांश ठिकाणी मॉन्सूनोत्तर पावसाने जोरदार हजेरी लावली असून रायगड, ठाणे, नाशिक, पालघर, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सोमवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील जांभूळधाबा येथे 166 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे पीक काढण्याच्या कामात अडथळे येत आहेत.
Rain News | परतीच्या पावसाची राज्यात पुन्हा हजेरी; हवामान विभागाचा शेतकऱ्यांना इशारा
पावसाचा जोर अजूनही कायम
कोकणातील ठाणे जिल्ह्यातील दहिसर, कल्याण, बेलापूर टिटवाळा येथे जोरदार पाऊस झाला असून रायगड मधील खारवली येथे 63 मिलिमीटर तर रोहा, नागोठणे, कोलाड, मेंढा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पालघर मधील विरार येथे 82 मिलिमीटर तर आगाशी 76, माणिकपूर 64 मिलिमीटर, वसई, निर्मल, मांडवे येथे जोरदार पाऊस झाला. असून विजांच्या कडकडाटासह उर्वरित जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या.
पावसामुळे भात पीक कापणी रखडली
तर सतत पडणाऱ्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील भात पीक कापणी रखडली असून त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पाऊस कधी थांबणार आणि भात पिकाची कापणी कधी होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे. सोमवार दि. 14 ऑक्टोबरच्या सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ऑक्टोबर येथे चटका कायम असला तरी पावसाचा जोर अजूनही ओसरलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत पावसाच्या सरी बरसत आहेत. जिल्ह्यात रविवारी सकाळपासून कडक ऊन होते. परंतु दुपारी 12 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या. त्यानंतर संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ देखील झाली होती. रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस झाला.
Rain News | आज राज्यात 3 जिल्ह्यांना रेड तर, तर आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर
‘या’ भागात अतिवृष्टी
तर या जिल्ह्यातील 4 मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली असून बीड, जालना जिल्ह्यातील काही मंडलांना सोडता बहुतांश मंडलात तुरळक ते हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. मलकापूर, नांदूर तालुक्यात अतिवृष्टीसदृश्य वादळी पाऊस झाला. बुलढाणा, खामगाव, चिखली या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून जिल्ह्यातील मागील 4 दिवसात बऱ्याच भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर मागील 24 तासात मलकापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून 117 मिलिमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. (Rain News)