Rabbi MSP | केंद्र सरकारकडून रब्बीचा हमीभाव जाहीर; मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्क्यांनी मिळतेय वाढ?


Rabbi MSP | 2025-26 च्या रब्बी हंगामातील पिकांना किमान आधारभूत किमतीमध्ये म्हणजेच हमीभावात केंद्र सरकारने वाढ केली असून त्यानुसार, गावासाठी 150 रुपये, मसुरीसाठी 275 रुपये तर हरभऱ्यासाठी 210 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. 2025-26 रब्बी गाव्हासाठी प्रतिक्विंटल 2,425 रुपये, मसूरसाठी प्रतिक्विंटल 6 हजार 700 रुपये तर हरभऱ्यासाठी प्रतिक्विंटल 5 हजार 650 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आर्थिक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत रब्बी पिकांच्या हमीभाव वाढीस मान्यता देण्यात आली आहे.

Agro News | ऐन सणासुदीला नाशकात अवकाळीमुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांवर दुबार रोपनिर्मितीची वेळ

तसेच, बार्लीसाठी प्रतिक्विंटल 130 रुपये, करडईसाठी प्रतिक्विंटल 140 रुपये, मोहरीसाठी प्रतिक्विंटल 300 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला. 2025-26 चा रब्बी हंगामासाठी बार्लीला प्रतिक्विंटल 1,980 रुपये, करडईसाठी 5 हजार 940 रुपये तर मोहरीसाठी 5 हजार 950 रुपये हमीभाव जाहीर केला आहे.

Agro News | सणांमुळे झेंडूच्या दरात वाढ

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा हमीभावात वाढ

केंद्र सरकारकडून 2024-25 च्या रब्बी हंगामासाठी गाव्हासाठी 2 हजार 275 रुपये, हरभऱ्यासाठी 5,440 बार्लीसाठी 1,850, मसूरीसाठी 6 हजार 425 रुपये, करडईसाठी 5,800 रुपये तर मोहरीसाठी 5,650 रुपये हमीभाव जाहीर केला होता. यादरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या रब्बी हंगामासाठी गव्हाच्या हमीभावात 150 %, बार्ली 60%, मसूर 89%, करडई 50% आणि मोहरी 98% वाढ केल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला गेला आहे. तसेच उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचे सरकारने सांगितलं आहे. (Rabbi MSG)