Onion Rate | आज राज्यातील बाजार समितीत 1 लाख 76,126 क्विंटल कांद्याची आवक; काय मिळाला दर..? वाचा सविस्तर


Onion Rate | राज्यातील बाजार समितीमध्ये आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी 1 लाख 76,126 क्विंटल कांद्याचे आवक झाली असून नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची 47 हजार व सोलापूर बाजारभाव 58 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. तर आज कांद्याला किमान 2,600 रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे.

Onion News | कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार; श्रीलंकेत कांदा निर्यात वाढण्याची शक्यता

आज कांद्याला मिळालेला दर पुढीलप्रमाणे:

सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला 2,600 रु., येवला बाजारात 2,900 रु., बारामती बाजारात 5,000 रु., लासलगाव विंचूर बाजारात 3,800 रुपये तर देवळा बाजारात 3,500 रु. असा दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याला 4,250 रुपये मंगळवेढा बाजारात 3,300 रु. असा दर मिळाला असून लासलगाव बाजारात उन्हाळा कांद्याला 3,700 रु. असा दर मिळाला.

Onion Rate | उन्हाळ कांद्याची आवक घटली; नाशिक जिल्ह्यात आज 16 हजार क्विंटल कांद्याची आवक

सटाणा बाजारात 5,735 रु., कळवण बाजारात 5,850 रु. तर पिंपळगाव बसवंत बाजारात 5,711 रु. दर मिळाला. कोल्हापूर 2,500 रु., अकोला 3,500 रु., छत्रपती संभाजीनगर 2,850 रु., सातारा 4,000 रु., धुळे 4,500 रु., अमरावती – फळ आणि भाजीपाला 3,100 रुपये असा दर मिळाला. (Onion Rate)