Onion Rate | उन्हाळ कांद्याची आवक घटली; नाशिक जिल्ह्यात आज 16 हजार क्विंटल कांद्याची आवक


Onion Rate | उन्हाळ कांद्याच्या आवाकेत घट झाली असून आज दिवसभरात 680 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली आहे. परंतु लाल कांद्याच्या आवकेत वाढ कायम असून फक्त नगर जिल्ह्यामध्ये 55 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. या कांद्याला किमान 2,800 रुपयांपासून, कमाल 6 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे.

Onion Rate | आज राज्यातील बाजार समितीत 1 लाख क्विंटल कांद्याची आवक; काय मिळाला दर…? वाचा सविस्तर

नाशिक जिल्ह्यामध्ये 16,000 क्विंटल आवक

पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 48,000 तर नाशिक जिल्ह्यामध्ये 16,000 क्विंटल आवक झाली आहे. लाल कांद्याला नगर बाजारपेठेत 3,700 रुपये, लासलगाव निफाड बाजारपेठेत 3,500 रुपये, येवला बाजारात 3,250 रुपये, नागपूर बाजारात 3,000 रुपये तर भुसावळ बाजारात 4,000 रुपये असा दर मिळाला.

Onion News | कांद्याला परराज्यातून मागणी वाढली; नव्या कांद्याला बाजारात काय मिळाला दर…? वाचा सविस्तर

तर अहमदनगर बाजारपेठेत कांद्याला 4,400 रुपये, बाजारात 5,800 रुपये, लासलगाव-निफाड बाजारात 4,200 तर पिंपळगाव-बसवंत बाजारपेठेत 6,001 असा दर मिळाला आहे. तसेच पुणे बाजारपेठेत लोकल कांद्याला 3,900 रुपये दर मिळाला. अकोला बाजारात किमान 2,500 कमाल 4,500 रु. तर सरासरी 3,500, छत्रपती संभाजीनगर बाजारात कीमान 1,200, कमाल 4,700 तर सरासरी 2,950 रु., धुळे बाजारात किमान 500, कमाल 4,413 तर सरासरी 3,175 रु., कोल्हापूर बाजारात किमान 1000, कमाल 6,500 तर सरासरी 2,800 रु., नागपूर बाजारात किमान 2,400, कमाल 4,400 तर 3,900 रु. असा दर मिळाला. (Onion Rate)