Onion Rate | आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीत कांद्याची 1 लाख 49 हजार 418 क्विंटल आवक झाली असून सोलापूर व नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची सुमारे 37 हजार तर नगर जिल्ह्यात 18 हजार क्विंटल आवक झाली आहे. आज कांद्याला किमान 2 हजार रुपयांपासून ते कमाल 6 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
Onion News | कांद्याला परराज्यातून मागणी वाढली; नव्या कांद्याला बाजारात काय मिळाला दर…? वाचा सविस्तर
नाशिकमध्ये कांद्याला काय दर मिळाला
पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याला 5,900 रु., कळवण बाजारात 6,500 रु., सटाणा बाजारात 5,850 रु. असा दर मिळाला आहे. तर लाल कांद्याला लासलगाव बाजार 4,151 रु., सोलापूर बाजारात 2,700 रु., मनमाड बाजारात 4,000 रुपये असा दर मिळाला आहे.
Onion Rate | सोलापूर बाजार समितीत कांदा दरात सुधारणा; काय मिळाला दर…? वाचा सविस्तर
तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला 4,750 रु., एक नंबरच्या कांद्याला कल्याण बाजारात 5,100 रु., अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 3,350 रु., जळगाव बाजारात पांढऱ्या कांद्याला 2 हजार रु. तर नाशिक बाजारात पोळ कांद्याला 4,250 रुपये असा दर मिळाला आहे. (Onion Rate)