Onion Rate | आज गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. आज दहा किलो कांदा 700 रुपये या भावाने विकला गेला असल्याची माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली आहे.
Onion News | दिवाळ सणामुळे रखडलेले कांद्याचे लिलाव पूर्ववत; काय मिळाला भाव वाचा सविस्तर
बाजार समितीत 3,465 तर नवीन 500 पिशवी कांद्याची आवक झाली
बाजार समितीत सध्या नवीन कांदा दाखल झाला असून जुन्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला आहे. तर नवीन कांद्याला मात्र कमी बाजारभाव मिळाला. तर बाजार समितीत 3,465 पिशवी कांद्याची आवक झाली असून चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला सातशे रुपये या भावाने दर मिळाला तसेच शेतकऱ्यांच्या बराखीतील कांदा संपत आला असून नवीन नवीन कांद्यांची साधारणतः 500 पिशव्यांची बाजार आवक झाली आहे.
Onion News | कांद्यावर पिळरोग, करापाचा प्रभाव; कृषी विभागाकडून अद्याप पंचनामे नाहीत
कांद्याला मिळालेले दर पुढीलप्रमाणे :
सुपर स्लॉट 1 नंबर गोळ्या कांद्याला 650 ते 600 रुपये दर मिळाला असून सुपर गोळे कांदे एक नंबरला 630 ते 650 असा दर मिळाला. सुपर मिडीयम दोन नंबर कांद्याला 550 ते 630 रुपये तर गोल्टी कांद्यास 350 ते 450 दर मिळाला बदला कांद्यास 250 ते 400 रुपये असा दर मिळाला. तसेच नवीन कांद्यापैकी सुपर गोळे कांदा 1 नंबरला 520 ते 550 रुपये दर मिळाला असून सुपर मिडीयम दोन नंबर कांद्यास 350 ते 500 20 रुपये, गोल्टी कांद्यास 200 ते 350 रुपये व बदला कांद्यास 50 ते 130 रुपये असा दर मिळाला आहे. (Onion Rate)