Onion News | दिवाळीपर्यंत कांदा शंभरी गाठणार; आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ


Onion News | किरकोळ बाजारात कांद्याची मागणी वाढलेली असताना सध्या आवक कमी झाल्याने कांद्याचा प्रतिकिलोचा दर 70 रुपयांवर पोहोचला आहे. त्यात नवीन कांद्याची आवक नोव्हेंबर पर्यंत वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. सणाच्या काळात कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.

Onion News | श्रीरामपूर मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली

दर आणखी वाढण्याची शक्यता

आवक घटल्यामुळे कांद्याचे दोन महिन्यांपूर्वी घसरलेले दर पुन्हा वाढू लागले असून खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यातून कांद्याचे आव्हान होत आहे. घाऊक बाजारात दहा किलो कांदा 40 ते 45 रुपये दराने मिळत असून बाजारात रोज 1000 ते 1200 पिशव्यांची आवक होत आहे. नवा कांदा बाजारात येईपर्यंत आवक कमी राहणार आहे. त्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दिवाळीपर्यंत कांदा शंभरी गाठणार

सध्या कांद्याचे भाव दर किलोला 54, किरकोळ दर किलोला 70 रू. असे आहेत आणि दहा किलोला 450 आणि 700 रुपये याप्रमाणे आहेत. असे बाजारपेठेतील व्यापारी वर्गाच्या सूत्रांनी सांगितले आहे. वखारीत पाठवलेल्या जुन्या कांद्याची सध्या आवक सुरू असून या कांद्याचा दर्जा चांगला आहे डिसेंबर मध्ये नवीन कांद्याचे आवक सुरू होते तो तोवर जुना कांदा बाजारात असेल सध्या किरकोळ बाजारात कांदा 70 रु.प्रति किलो असून दिवाळीपर्यंत कांदा शंभरी गाठण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

Onion News | कांदा अनुदानापासून शेतकरी वंचित

कांद्याला परराज्यातून मागणी

कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यातून मागणी होत असल्याने मार्केट यार्डतून कांदा दक्षिण भारतात जात आहे त्यामुळे सध्या कांद्याला परराज्यातून मोठी मागणी असून पुढील महिन्यात कर्नाटकात नवीन कांदा येणार आहे त्यामुळे तेथून काही प्रमाणात मागणी कमी कोणाची शक्यता आहे. परंतु, केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेशातून मागणी कायम असणार असून त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचा दर पुढील काही महिने तेजीत असेल असे कांदा व्यापारी सांगत आहेत. (Onion News)