Onion News | श्रीरामपूर मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली


Onion News | बुधवार दि. 2 ऑक्टोबर रोजी श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये मोकळा कांदा लिलाव पद्धतीने 19 साधनातून आवक करण्यात आला होतो. यावेळेस कांद्याला 3875 रु. इतका सर्वाधिक भाव मिळाला.

Onion News | कांदा अनुदानापासून शेतकरी वंचित

काय मिळाला दर

प्रथम श्रेणी कांद्याला 3600 ते 3875 तर द्वितीय श्रेणीच्या कांद्याला 2850 ते 3575 तसेच तृतीय श्रेणीच्या कांद्याला 2350 ते 2750, गोल्टी कांदा 3150 ते 3550 व खाद कांदा 2300 ते 2340 रुपये प्रतिक्विंटल ने लिलावात विकला गेला.तर अमावस्येमुळे कांद्याची आवक घटली होती व बाजारभाव देखील मंदावले होते. परंतु, शेतकऱ्यांकडून मोकळा कांदा लिलाव पद्धतीत चांगला प्रतिसाद मिळाला असून सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस कांद्याचे लिलाव होत असल्याचे सभापती सुधीर नवले यांनी सांगितले.

Onion News | राज्यातील कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटनेची विशेष बैठकीची मागणी

अहमदनगर बाजार समितीत कांदा लिलावासाठी दाखल

तसेच, अहमदनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतीच्या गावरान कांद्याला 3400 ते 4 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला यावेळी 25629 क्विंटल गावरान कांद्याचे आवाज झाली तर दुसरीकडे 3529 क्विंटल लाल कांदाही निलावासाठी दाखल झाला होता त्याला 3000 ते 3500 रुपये इतका भाव मिळाला. (Onion News)