Nashik | नाशिक जिल्ह्याला पिक विमा योजनेअंतर्गत ८६७ कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित – दादा भुसेंची माहिती


Nashik | जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी शासनाने निधी हस्तांतरीत केला असल्याची माहिती नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकल्पनेतुन प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत १ रुपयात पिक विमा या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ५.५० लक्ष पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी १ रु. भरुन सदर योजनेत सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या हिश्शाची उर्वरित रक्कम शासनाने भरली.

Nashik Rain | नाशकात परतीच्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान; शेतकऱ्यांकडून तात्काळ मदतीची मागणी

दादा भूसेंच्या पाठपुराव्याला यश

राज्य हिस्सा व केंद्र हिस्सा रक्कम वर्ग करण्यात आली असून १ रुपयात पिक विमा व विमा कंपन्यांसाठी नफा १० % व तोटा नुकसान जबाबदारी १०% मॉडेल असल्यामुळे कंपनीला उर्वरित रक्कम भरुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागली. ८४६.५३ कोटी = ११०%, कंपनी १९०.१६ कोटी, राज्य शासन ६५६.३७ कोटी सन २०२३-२४ वर्षात संपुर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने पिक विम्याची रक्कम मिळण्यासाठी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सतत पाठपुरावा केला. येणाऱ्या २ दिवसांत सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीमार्फत वर्ग केली जाईल, यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.