Garlic Rate | सध्या किरकोळ बाजारात लसणाचे भाव 400 ते 450 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले असून आगामी काळात हा भाव आणखीन वाढवून 500 ते 600 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज लसूण विक्रेत्यांनी कर्तव्य आहे. परिणामी लसणाचा तुटवडा सर्वत्र जाणवू लागला आहे. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात शेतकरी वर्षभर घरी लागेल या प्रमाणात लसणाची लागवड करतात. आता काही शेतकरी लसूण लागवडीकडे वळला असून यंदा लसूण लागवडीपेक्षा कांद्याची लागवड जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे.
Garlic Rate | बारामती बाजार समितीत लसणाचे भाव वधारले
जानेवारी नर्व पीक बाजारात येईपर्यंत लसणाचे भाव तेजीत
तर मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात सारख्या लसणाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये पाऊस अधिक झाल्यामुळे पिके वाया गेल्याने आवक घटल्याचे बोलले जाते. सध्या बाजारामध्ये मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्यामुळे लसणाचे दर शिगेला पोहोचले आहेत. पावसामुळे आवक कमी झाली असून जानेवारी नर्व पीक बाजारात येईपर्यंत लसणाचे भाव तेजीत राहणार असून नवीन लसूण बाजारात दाखल झाल्यानंतर दर कमी होण्याचा अंदाज आहे.
Garlic News | दर स्थिर करण्यासाठी अफगाणिस्तानातून लसणाची आवक; फेब्रुवारीपर्यंत दर तेजीतच
गृहिणींची तयार लसूण पेस्टला पसंती
दरम्यान, लसणाच्या वाढलेल्या भावामुळे फोडणीसाठी लसणाऐवजी आता विविध कंपन्यांच्या तयार लसूण पेस्टचा पर्याय गृहिणींनी शोधला असून ही तयार पेस्ट बाजारात पाच ते दहा रुपयांपासून उपलब्ध असल्यामुळे ती परवडणारी पेस्ट घेण्याकडे गृहिणींचा कल वाढला आहे. (Garlic Rate)