सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | सरस्वतीवाडी ता. देवळा येथून चक्क कांद्याने भरलेले ट्रॅक्टर चोरीस गेल्याने नागरिक भयभीत झाले असून, या घटनेबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Onion News | आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचे लिलाव बंद राहणार
सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली घटना
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सरस्वतीवाडी येथील शेतकरी विजय झिषु आहेर यांचे मालकीचे महींद्रा कंपनीचे लाल रंगाचे सरपंच ट्रॅक्टर क्र. ( MH-41-D-383 ) हे कांदा भरुन चाळीत उभे केलेले असतांना, सोमवारी दि. ७ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास चोरुन नेले आहे. मंगळवारी दि. ८ रोजी सकाळी चाळीत ट्रॅक्टर दिसत नसल्याचा प्रकार विजय आहेर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती आपल्या जवळच्या लोकांना सांगितली व ट्रॅकटरची आजूबाजूला शोधाशोध सुरू केली. या प्रकाराबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Onion News | दिवाळीपर्यंत कांदा शंभरी गाठणार; आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ
बाजारभावानुसार दीड लाख रुपयांचा कांदा चोरीला
देवळा पोलिसांनी आपल्या हद्दीत सदर ट्रॅक्टरचा शोध घ्यावा अशी मागणी ट्रॅक्टर मालक आहेर यांनी केली आहे. सद्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजार भाव मिळत असून, चोरीस गेलेल्या ट्रॅकटरमध्ये आजच्या बाजार भावानुसार जवळपास दीड लाख रुपयांचा कांदा भरलेला होता. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, अशा चोरट्यांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. (Deola)
“दहा वर्षांपूर्वी कांद्याला पाच ते सहा हजार रुपये क्विंटल असा दर मिळत असल्याने त्यावेळी सटाणा बाजार समितीच्या आवारातुन किकवारी व धांद्री येथील शेतकऱ्यांचे कांदे भरलेले ट्रॅकटर चोरीला गेले होते, चोरट्यांनी यातील कांद्याची परस्पर विल्हेवाट लावून ट्रॅकटर रिकामे करून रस्त्यालगत असलेल्या खळ्यात आणून सोडले. अशा घटनांचा आजुबाजुला, तसेच शेजारच्या बाजार समित्यांमध्ये बारकाईने लक्ष ठेवून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला जावा.”– कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना