Crops Damage | धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसामुळे सोयाबीन पिक पाण्याखाली


Crops Damage | मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे या पावसाने सोयाबीनच्या काढणीच्या कामात व्यत्यय आणला आहे. काही भागात सोयाबीनचे पीक पाण्याखाली आहे. यातच गुरुवारी लोहारा तालुक्यातील अनेक गावांना वादळी पावसाने झोडपून काढले, ज्याचा सर्वाधिक फटका खेड व नागौर गावांना बसला असून झाडे उन्मळून पडली तर विजेच्या तारा तुटल्या व अनेक घरांमध्ये पाणी देखील शिरले. दोन घरांच्या भिंती कोसळून नुकसान झाले असून गुरुवारी दुपारी खेड, नागूर, सालेगाव भागात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे.

Agro News | टोमॅटोच्या आवाकीत घट; व्यापारी मालाच्या प्रतीक्षेत

पावसामुळे घरांचे नुकसान

खेडमध्ये अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अनेक उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली असून विजेच्या खांबावरील ताराही तुटल्या, ज्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. उसाचे पीकही आडवे झाले असून राजेंद्र जाधव, दीपक जाधव यांच्या घरांच्या भिंती कोसळल्याने घरांचे ही नुकसान झाले आहे.

सोयाबीन काढणीचे काम ठप्प

त्याचबरोबर शेखर पाटील, भीमाशंकर कडबाने, हनुमंत पाटील, विश्वनाथ पाटील, सिद्राम पाटील, ऋषिकेश पाटील यांनी वाळू घातलेल्या 700 पोत्यापेक्षा अधिक सोयाबीन भिजले असून माकणी, सातपूर, नागुर, खेड, हिप्परगा, कानेगाव, आष्टाकासार, जेवळी, अचलेर, भातागळी, तोरंबा, धानोरी, हराळी, भोसगा, तावशीगड, वडगाव गा., वडगाव वाडी, विलासपुर पांढरी, धानोरी हराळी, हिप्परगा सय्यद, करवंजी, मार्डी आदी भागात सलग चार दिवसांपासून होत असलेल्या वादळी पावसामुळे सोयाबीन काढणीचे काम ठप्प झाले असून सखल भागातील पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Agro News | खाद्यतेल-तेलबियांच्या राष्ट्रीय मिशनला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

सोयाबीन पाण्याखाली

शेखर पाटील, विश्वनाथ पाटील, भीमाशंकर कडबाने, ऋषीकेश पाटील, हणमंत पाटील, सिद्राम पाटील यांनी वाळू घातलेले सातशे पोत्यांहून अधिक सोयाबीन भिजले असून सास्तूर, नागूर, माकणी, हिप्परगा (रवा), खेड, फनेपूर, तावशीगड, अचलेर, जेवळी, आष्टाकासार, धानुरी, रुद्रवाडी, विलासपूर पांढरी, हिप्परगा सय्यद, करवंजी, वडगाव वाडी, भोसगा, वडगाव गां, मार्डी या भागांमध्ये सलग चार दिवसांपासून झालेल्या वादळी पावसाने सोयाबीनच्या काढणीचे काम ठप्प झाले असून सखल भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. (Crops Damage)