Crop Damage | वर्ध्यात नुकसानग्रस्त भागात पंचनामे रखडले; संतप्त शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा


Crop Damage | वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील विजयगोपाल महसूल मंडळात 31 ऑगस्टला अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. यावेळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली. मात्र या तक्रारीला ५० दिवस उलटून गेले असून सुद्धा अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आजच्या घडीला 90% सोयाबीन पिकाची काढणी झाल्याने कंपनीच्या आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

Crop Damage | परतीच्या पावसाने लाल कांद्याचे नुकसान; शेतकरी हवालदिल

तक्रार देऊन पन्नास दिवस उलटून देखील पंचनामे नाहीत

शेतकऱ्यांच्या हिताकरिता व झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी फक्त 1 रुपयात विमा काढून दिला गेला. वर्धा जिल्ह्यात शासनाकडून आयसीआयसीआय लोंम्बर्ड कंपनीने योजनेचे काम हाती घेतले होते. हजारो शेतकऱ्यांनी हा पीक विमा काढलेला आहे. मात्र पीक विमा काढल्यापासून तक्रार टाकेपर्यंत आज जवळपास 50 दिवस उलटून गेले असून 90% शेतकऱ्यांची सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे. तरी देखील शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही पंचनामे झाले नाही. विजयगोपाल महसूल मंडळ 31 ऑगस्टला अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली होती. यावेळी 144 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. नुकसानाच्या 72 तासांच्या आत तक्रारी केल्यास 25 दिवसांच्या आत पंचनामे केले जातील असे त्यावेळी सांगण्यात आले होते. परंतु तक्रारी टाकल्यापासून 50 दिवस उलटून गेले असूनही पंचनामे करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

600 ते 700 तक्रारींचे पंचनामे बाकी

विजयगोपाल महसूल मंडळात नुकसान झाल्याच्या जवळजवळ एक हजार दोनशे तक्रारी देण्यात आल्या असून आतापर्यंत निम्म्या तक्रारीचे पंचनामे झाले आहेत. परंतु अजून जवळपास 600 ते 700 तक्रारींचे पंचनामे बाकी असल्याचे बोलले जात आहे. एकट्या विजयगोपाल मधील 200 शेतकरी बाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

Crops Damage | निफाडमध्ये हाता तोंडाशी आलेल्या टोमॅटो पिकाचे माथेफिरूकडून नुकसान; शेतकरी हवालदिल

शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

“शेतात झालेल्या पीक नुकसानाची 1 सप्टेंबरला तक्रार दिली. मात्र अजूनपर्यंत शेतातील पंचनामे झालेले नाहीत. माझ्यासारखे अजून 200 शेतकरी आहेत. जर 2 दिवसात यावर काही तोडगा निघाला नाही. तर आम्ही कंपनी विरोधात आंदोलन करू” असा इशारा अभिलाष धांगे या शेतकऱ्याकडून देण्यात आला आहे. तर यावर आयसीआयसीआय लोम्बर्ड कंपनीचे जिल्हा समन्वयक वसीम शेख यांनी “पंचनामे झाले नसतील तर तक्रारी रद्द झाल्या असतील किंवा सरासरी सॅम्पल लागले असतील. हे बघून सांगावे लागेल.” असे म्हटले. तर “तुमच्याकडून तक्रारी रद्द झाल्याचे सांगण्यात येते आहे. परंतु डॉकेड आयडी आल्यावर तक्रारी रद्द कशा झाल्या? रद्द झाल्याच तर शेतकऱ्यांना कळवले का नाही? कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याकरिता कंपनीला त्याचे परिणाम भोगावेच लागतील.” असा इशारा युवा संघर्ष मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष राहुल पेटकर. (Crop Damage)