Cotton Rate | शेतकऱ्यांनी पहिल्या वेचणीतील भिजलेल्या कापसास साठवून ठेवल्यास उरलेल्या कापसाची प्रत खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे कापूस विक्रीसाठी बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. या कापसाला ओलाव्याचे प्रमाण लक्षात घेत पांढरकवडा बाजारात 6,800 रुपयांचा दर मिळत आहे.
Cotton News | आंतरराष्टीय बाजारात ‘या’ पिकाची मागणी वाढली
प्रत खालावण्याच्या भीतीने शेतकऱ्यांचा विक्रीवर भर
बोंडातील परिपक्व झालेल्या कापसाला मॉन्सूनंतर पावसाचा फटका बसला. बोंडातील कापूस भिजल्याने त्याची प्रत खालावली असून हा कापूस घरात साठवला तर दुसऱ्या व तिसऱ्या वेचनीतील कापसावर परीणाम होऊन सगळ्याच कापसाची प्रत खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ओलाव्याचे प्रमाण अधिक असताना देखील पहिल्या वेचणीतील कापूस बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे.
तर विलास कोटनाके या शेतकऱ्याच्या माहितीनुसार, 25 एकरावर कापसाची लागवड करण्यात आली असून कापसाला सरासरी 7,521 रुपयांचा हमीभाव मिळत असून त्याकरिता दर्जाचा कापूस असावा अशी अट ठेवण्यात आली आहे. परंतु मॉन्सूनोत्तर पावसाच्या परिणामामुळे बोंडातील कापूस भिजला आहे. त्यामुळे कापसात सध्या २० टक्के मोईश्चर आहे.
Agro News | ऐन दिवाळसणात भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादकांना फटका; द्यावी लागतेय दुप्पट मजुरी
पहिल्या वेचणीतील कापसाला सहा हजार आठशे रुपयांचा दर
4 एकरातील पहिल्या वेचणीतून 15 क्विंटल उत्पादकता मिळाली असून आणखीन 2 वेचे होतील त्यातून 4 क्विंटल व 2 क्विंटल याप्रमाणे, एकरी सरासरी 10 ते 11 क्विंटल उत्पादकता अपेक्षित आहे. तर पहिल्या वेचणीत कापसाला 6,800 रुपयांचा दर मिळाला होता. (Cotton Rate)