Agro News | भोर तालुक्यातील आंबवडे, वीसगाव, बेळवंट भूतोंडे व महुडे खोऱ्यात इंद्रायणी तांदळाच्या उत्पादनात 30 टक्क्यांनी घट झाली असून त्यामुळे यावर्षी बाजारात इंद्रायणी तांदूळ कमी येणार असल्याने तांदळाचे दर 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
Agro News | रब्बी हगांम सुरू तरी, मागच्यावर्षी गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई नाही
अवकाळीचा भात पिकावर परिणाम
भात पिक फुलोऱ्यात असतानाच प्रमाणापेक्षा व अवेळी जास्त पाऊस झाल्याने भात पीक फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना फुलोरा झाडून गेल्याने याचा परिणाम भात पिकाच्या उताऱ्यावर झाला आहे. तसेच जास्त पावसामुळे भाताच्या चौथ्याने दुबार फुटवा धरल्याने सुरुवातीच पीक परिपक्व असून दुबार फुटवा पूर्ण पंळजावर गेले आहे.
रोगाच्या प्रादुर्भावाने पिकाचे नुकसान
त्यात वातावरणीय बदलांमुळे इंद्रायणी जातीच्या भात पिकावर तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतात ठिकठिकाणी तुडतुड्याने खोडातील अन्नरस शोषल्यामुळे भाताचे करपून गेलेले गोलाकार पीक पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी भात पिकाच्या खोडावर असंख्य तुडतुडे आढळून येत असून यामुळे भातशेती संकटात आली आहे. यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
Agro News | सोयाबीनच्या शासन आधारभूत किंमतीत विक्रीसाठी नाव नोंदणीची मुदत वाढली
इंद्रायणी तांदळाच्या उत्पादनात घट
अवकाळी अतिरिक्त पाऊसामुळे भात पिकावर परिणाम झाला असून पीक तयार होण्यास विलंब झाल्याने कापणी 15 दिवसांपेक्षा जास्त वेळ उशिराने होत आहे. परिणामी रब्बीचा हंगाम लांबणीवर पडला. ज्वारी हरभरा पिकांची पेरणी लांबणीवर पडल्यामुळे या पिकांना पावसाअभावी फटका बसणार असून इंद्रायणी तांदळाच्या उत्पादनात 30 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्याने इंद्रायणी तांदळाचे दर 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. (Agro News)