Agro News | परतीच्या पावसामुळे रब्बीच्या पेरणीवर संक्रांत; ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता


Agro News | यावर्षी पावसाळ्या व्यतिरिक्त परतीचा पाऊस चांगला पडल्याने रब्बी हंगामातील पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे. ऑक्टोबर महिना संपला असला तरी देखील केवळ 15 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारी पेरणी झाली आहे. तर यंदा ज्वारीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले होते. तर शेतात पाणी कुठून आणायचे? अशी स्थिती होती. त्यामुळे ऊस क्षेत्राला मोठा फटका बसला होता. ऊस क्षेत्र कमी झाले आणि जून महिन्यापासून सलग चांगला पाऊस पडत गेल्यामुळे खरीप क्षेत्रात मोठी वाढ झाली.

Agro News | पावसामुळे सांगलीत उसाचा गाळप हंगाम लांबणीवर

सततच्या पावसामुळे वाफसा येण्यात अडचण

खरीप पिकांची काढणी करून ऊस व रब्बी हंगामातील इतर पिके घेण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. परंतु सततच्या पावसामुळे जमिनीत वाफसा झाला नाही. त्यामुळे ज्वारी पेरणी करता आली नाही. अनेक ठिकाणची खरीप पिके निघाल्याने रान रिकामे झाले असले, तरी वाफसा आला नसल्यामुळे मशागत करून ज्वारी पेरणी करता आली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात अवघ्या 15 हजार हेक्टरवर ज्वारी पेरणी झाली असून पावसामुळे त्याची चांगली उगवण होण्याची शक्यता कमीच आहे. ज्वारी पेरणीचा कालावधी निघून गेल्यानंतर ज्वारी पेरणी करणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात 23 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी

त्यात सध्या चित्रा नक्षत्र सुरू असून वाहन पर्जन्य सुचक म्हैस आहे. जून सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्याशिवाय चित्रा नक्षत्रातही परतीचा पाऊस पडत असून गेल्या 3 दिवसांत जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. जिल्ह्यात 23 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. ज्यामध्ये पंधरा हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक 4,000, सांगोला तालुक्यात 3,500 हजार, हेक्टरवर दक्षिण तालुक्यात, बीड, मोहोळ तालुक्यात 1,000 हेक्टरवर तर करमाळा तालुक्यात 2,500 हजार इतर तालुक्यांमध्ये 500 ते 300 हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पेरणी झाली मका, गहू, हरभरा व इतर पिकांची 8000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची कृषी खात्याकडे नोंद झाली आहे.

Agro News | नाशकात चोरट्यांची कांदा खळ्यावर डल्ला; 14 ते 15 गोणी कांदा चोरीला, सीसीटिव्ही देखील तोडले

अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात पाऊस

ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यामध्ये एकूण 93 मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात 62 मिली म्हणजेच 67% इतका पाऊस पडला आहे. माढा तालुक्यात सर्वाधिक 95 मिमी, माळशिरस तालुक्यात 71 मामी, अक्कलकोट, करमाळा, पंढरपूर व उत्तर तालुक्यांमध्ये प्रत्येकी 65 मिमी पाऊस झाला. तर इतर तालुक्यांमध्ये यापेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. (Agro News)