Agro News | सणांमुळे झेंडूच्या दरात वाढ


Agro News | दसरा आणि दिवाळीच्या काळात मातीमोल दराने विकाव्या लागलेल्या झेंडूच्या फुलांना यावर्षी पहिल्यांदाच चांगला दर मिळाला असून, अहिल्यानगर शहरात जिल्हाभरातील बाजारात यंदा दसऱ्याला झेंडू 100 ते 200 रुपये किलोपर्यंत विकला गेला असून ॲस्टर, शेवंती, पिवळी शेवंती यासह अन्य फुलांचे दरही तेजित होते.

Agro News | दसऱ्याच्या खरेदीत साखरेला अपेक्षेपेक्षा कमी दर; दिवाळीत दर वाढण्याची शक्यता

अन्य फुलांनाही चांगला दर

अहिल्यानगर तालुक्या बरोबर राहुरी, राहता, कोपरगाव, संगमनेर, अकोले भागातही फुलांच्या शेतीला शेतकरी प्राधान्य देत असतात. गुलाब शेवंती ॲस्टर व अन्य फुलांना चांगला दर असतो. परंतु झेंडूच्या फुलांना अनेकदा कवडीमोल दर असतो. मागच्या वर्षी दसऱ्याला अहिल्यानगर येथे झेंडूला केवळ 20 रुपये किलो दर मिळाला.

Agro News | तुर आणि हरभऱ्याच्या किमतीत घट तर कोरड्या हवामानामुळे यावर्षी आवक लवकर सुरू

झेंडूला 150 ते 200 रुपयांपर्यंत दर

तर यावर्षी पहिल्यांदाच झेंडूची दररोज स्थिती चांगली असून, श्रावणात झेंडू किरकोळ बाजारात 60 ते 90 रुपये किलोने विकला गेला. या 3 महिन्यांपासून झेंडूचे दर टिकून आहेत. तर नवरात्रोत्सवात मागील 2 महिन्यात मिळणाऱ्या दरांपेक्षा अधिक दर झेंडूला मिळाला. झेंडूला सरासरी 150 रुपये प्रति किलो भाव मिळाला असून, काही ठिकाणी 200 रुपयांपर्यंत दर होता. तर शेवंती, ॲस्टरला किलोला 300 रुपयांपर्यंत दर मिळाला. (Agro News)