Grape Farming |पावसाने झालेल्या चिखलामुळे नाशकात द्राक्षबागांतील कामांमध्ये व्यत्यय


Grape Farming | नाशिक जिल्ह्यात सप्टेंबरच्या अखेरीस तसेच मागच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागेत चिखल झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरने यंत्राद्वारे फवारणी करताना अडथळे येत आहेत. पाणी वाहून गेल्यानंतर चिखल झाल्याने गल्ल्यांमध्ये ट्रॅक्टर चिखलात अडकण्याची समस्या उद्भवत असून परिणामी कामांची गती मंदावल्याचे चित्र आहे. तर एकीकडे दराची, उत्पन्नाची शाश्वती नसताना देखील शेतकऱ्यांना आव्हानात्मक परिस्थितीत द्राक्ष हंगामाला सामोरे जावे लागत आहे.

Agro News | यंदा खरीप हंगामात सरासरी पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी

पावसामुळे छाटणीच्या कामात व्यत्यय

सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्ष पट्ट्यात टप्प्याटप्प्याने गोडी बहर छाटणीची कामे सुरू झाली असून चांदवड तालुक्यात वडनेरभैरव परिसरात छाटण्या सुरू झाल्या आहेत. या भागात बागा फुटून घड निघाले आहेत. मात्र पावसाने दणका दिल्यानंतर डाऊनी सारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संरक्षणात्मक फवारण्या केल्या जात होत्या, परंतु पावसामुळे या कामाची गती मंदावली आहे.

Agro News | समाधानकारक पावसामुळे यंदा खानदेशात तुरीची लागवड वाढली

चिखलामुळे पीक संरक्षण कामकाजात अडचणी

पावसानंतर गल्ल्यांमध्ये पाणी वाहत असताना ट्रॅक्टरने फवारणी यंत्र ने-आण करणे शक्य होते. परंतु पाणी कमी झाल्याने गल्ल्यांमध्ये चिखल उरल्याने पीक संरक्षण कामकाजात अडचणी येत असून ट्रॅक्टर चिखलात अडकत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर द्राक्ष उत्पादक शेतकरी कामात गती येत फवारणीत सुलभता यावी याकरिता 200 लिटरवर फवारणी यंत्राचा वापर करत आहेत. परंतु यंत्रे अडकत असल्याने काही ठिकाणी दोन ट्रॅक्टर लावून फवारणी केली जात आहे. तर काही शेतकरी 200 लिटर पेक्षा कमी फवारणी यंत्र ट्रॅक्टरला जोडून काम करीत आहेत. (Grape Farming)