Agro News | यंदा खरीप हंगामात सरासरी पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी


Agro News | राज्यात खरीपातील पिके शेवटच्या टप्प्यात आली आहेत. तर सोयाबीनची काढणी आवरली असून काही ठिकाणी रब्बीच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर कापसाच्या वेचणीला सुरुवात झाली असून काही भागातील बाजरी, मुगाची काढणी बाकी आहे. तर तूर, शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. राज्यात यंदा मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यामुळे पिके डौलदार असून मागील पाच वर्षांच्या खरीप हंगामाची तुलना केल्यास यंदाचा हंगा सरस ठरला आहे.

Agro News | समाधानकारक पावसामुळे यंदा खानदेशात तुरीची लागवड वाढली

सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी

दरम्यान, यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 103 तर मागील पाच वर्षाच्या तुलनेत 102.67% प्रेरणी झाली आहे. तेव्हा पाच वर्षांची तुलना केली तर 1 कोटी 42 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी 1 कोटी 40 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या, पण यावर्षी राज्यात मान्सूनचा पाऊस चांगला झाल्याने 1 कोटी 45 लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

त्यातही, पुणे विभागातील पेरणी खालील क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून पुणे विभागात 5 वर्षांच्या तुलनेमध्ये 136 टक्के तर मागील वर्षीच्या तुलनेत 121 टक्के पेरणी खालील क्षेत्र वाढले आहे. तर कोकण विभागात सर्वात कमी म्हणजे मागील 5 वर्षांच्या तुलने 84.99% तर मागील वर्षाच्या तुलनेत 91 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. कोल्हापूर विभागात मागील वर्षाच्या तुलनेत 121 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

Agro News | शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान मिळणार; अर्ज करण्यासाठी कोणते शेतकरी पात्र? वाचा सविस्तर!

खरीप ज्वारीच्या पेरणीत लक्षणीय घट

परंतु, पीकनिहाय विचार केला तर खरीप ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. सरासरीच्या केवळ 37% पेरणी झाली असून बाजरीच्या पेरणीच्या सरासरीच्या 60 टक्के, मुगाची पेरणी सरासरीच्या 60 टक्के, तर रागिच्या पेरणीत सरासरीच्या 87% पेरणी झाली आहे. ममक्याचे क्षेत्र मात्र वाढले असून सरासरीच्या 127% पेरणी झाली आहे. तीळ आणि कारळांची पेरणी सरासरीच्या तुलनेत केवळ 30 टक्के क्षेत्रावर झाली असून विशेष म्हणजे सोयाबीनची पेरणी ही सरासरीचे 124 टक्के झाली आहे. (Agro News)