Agro News | खानदेशात रब्बी हंगाम सुरू झाला असला तरी मागच्या जानेवारी ते मार्च या कालावधीत झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत किंवा मदतनिधी अद्यापही मिळालेला नसून वादळ व गारपीटीत पीक व अन्य नुकसान या संबंधीचे पंचनामे झाले असून अहवाल देखील तयार आहेत. परंतु मदतनीती पासून शेतकरी मात्र वंचित आहेत.
Agro News | कृषी विभागाकडून पिक विमा योजनेतील घोटाळे उघडकीस; बोगस अर्जांची फेर तपासणी सुरू
लवकरात लवकर मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा
या हवालानुसार, सुमारे 23 हजार हेक्टर वरील पिकांची मोठी हानी झाली आहे. हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे रवाना करण्यात नाही आला आहे. तर लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खानदेशात जानेवारीत देखील वादळ व गारपीट पाऊस झाला असून पुढे 26 व 27 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी वादळ व गारपीट झाली. जळगाव जिल्ह्यात 26 व 27 रोजी वादळात 18 हजार लिटर वरील पिकांचे नुकसान झालं होते. त्यानंतर 1 मार्च रोजी फटका बसला होता. तसेच 29 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान धुळे व नंदुरबार मध्येही गारपीट, वादळी पाऊस झाला. यामध्ये धुळ्यातील, शिरपूर, साक्री भागात मोठी हानी झाली होती.
Agro News | कृषी विभागाकडून पिक विमा योजनेतील घोटाळे उघडकीस; बोगस अर्जांची फेर तपासणी सुरू
गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
त्याचबरोबर, शिरपुरातील अर्थे, कुवे, निमझरी भागात केळी, मका, गहू, पपई, हरभरा या पिकांची मोठी हानी झाली होती. 26 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या कालावधीत खानदेशात विविध भागात पाऊस व गारपीट झाली यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. केळी, कलिंगड, पपई या शेतीमालाचे दरही कमी केल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यात केळीची विक्री देखील कमी दरात करावी लागली होती. केळीचे दर 1,800 रुपयांपर्यंत होते. थेट शिवार खरेदीत कलिंगडाचे दर 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान, 13 ते 14 रुपये प्रति किलो इतके होते. त्याचबरोबर पपई विक्रीत देखील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. (Agro News)