Agro News | कृषी विभागाकडून पिक विमा योजनेतील घोटाळे उघडकीस; बोगस अर्जांची फेर तपासणी सुरू


Agro News | कृषी विभागाकडून यावर्षीच्या खरीप हंगामातील पिक विमा योजनेतील मोठे घोटाळे उघड करण्यात आले असून कांदा पिकाची लागवड न करता पिक विमा अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची उलट तपासणी केली असता, बोगस अर्जाचा घोटाळा उघड झाला आहे. कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्या प्रयत्नातून सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान टळले आहे.

Agro News | मॉन्सूनोत्तर पावसामुळे पांढऱ्या कांद्याची लागवड लांबणीवर

पिक विम्याचे तब्बल 20 हजार 803 बोगस अर्ज

दरम्यान, राज्यात कांदा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र व संबंधित पिकाचे पीक विमा अर्ज यात तफावत आढळून आल्याने कृषी आयुक्तालयाकडून तातडीने उलट तपासणीचे आदेश देण्यात आले होते. या तपासणी दरम्यान कांदा पीक लागवड न करताच पिक विमा काढलेले 20,803 बोगस अर्ज आढळून आले असून त्याचे एकूण क्षेत्र 11,789 हेक्टर इतके आहे.

Agro News | वाढत्या महागाईत चोरट्यांचा लसणावर डल्ला; पंचवटी बाजारातून साडेतीन लाखांचा माल चोरीला

अजून घोटाळे बाहेर येण्याची शक्यता

तर बोगस पीक विम्याची तपासणी अद्यापही सुरू असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फेर तपासणी सुरू आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पिकाखालील क्षेत्र व विमा अर्जावरील क्षेत्रांमध्ये तफावत आढळून आली आहे. अशा जिल्ह्यांची तपासणी अद्याप बाकी असून अजूनही घोटाळे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Agro News)