Agro News | आपल्या दररोजच्या जेवणात लसणाचे महत्त्व असल्याकारणाने त्याला सर्वाधिक मागणी असते. त्यातच सध्या लसणाचे भाव गगनाला भिडले असून 400 रू. किलोनो लसूण विकला जात आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांकरीता या महागाईच्या काळात लसूण सोनं झालं आहे. लसणाचे दिवसेंदिवस वाढत चाललेले भाव यामुळे ते आता चोरट्यांच्या नजरेस पडू लागले असून पंचवटी येथील बाजार समितीत बंद दुकानातून चोरट्याने तब्बल साडेतीन लाख रुपयांचा 1,100 किलो लसूण चोरला आहे. याप्रकरणी आता पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
Agro News | व्यापाऱ्याने पैसे रखडवले; संतप्त शेतकऱ्यांचे लासलगाव बाजार समिती बाहेर आंदोलन
चोरट्यांचा लसणावर डल्ला
आवक घटल्याने लसणाचे भाव तेजीत असून चारशे रुपये किलोपर्यंत गेल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. मात्र भाव वाढ झाल्याचे लक्षात घेत चोरट्यांनी देखील लसणाला लक्ष केल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. मखमलाबाद येथील रहिवासी तुषार माणिक कानकाटे यांच्या फिर्यादीनुसार, बाजार समितीत त्यांचे चाळीस क्रमांकाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात दि. 10 ते 11 नोव्हेंबर दरम्यान चोरट्यांनी 1100 किलो वजनाच्या लसनाने भरलेल्या 22 गोण्यां चोरल्याची घटना घडली. हा प्रकार लक्षात येताच कानकाटे यांनी पंचवटी पोलिसात धाव घेत 3 लाख 50 रुपयांच्या लसणाची चोरी झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. लसणाची चोरी होताच इतर व्यवसायिकही सतर्क झाले असून आपला माल सुरक्षित ठेवण्यावर भर दिला आहे. तर पोलिसांनी देखील बाजार समिती परिसरात गस्त वाढवली आहे.
Agro News | लातूर जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनात; वेचणी अभावी कापूस शेतात पडून
चोरट्यांचा शोध सुरू
तर मागील वर्षी सातपूर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटमधून 30 किलो लसणाची गोणी पळवली होती. यावेळी लसणाचा भाव प्रति किलो 250 रुपये होता. यंदा पुन्हा लसणाचे भाव वाढल्याने चोरी झाल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी ठराविक चोरट्यांना लक्ष केले आहे. (Agro News)