Agro News | लातूर जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनात; वेचणी अभावी कापूस शेतात पडून


Agro News | यावर्षी लातूर तालुक्यात परतीच्या पावसाने कापसाचे नुकसान झाले असून सर्व शेतकऱ्यांचा कापूस एकाच वेळी वेचणीला आल्याने मजूर मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात कापूस वेचणी विना उभा असल्याने अनेक शेतकऱ्यांना परिवारासह कापूस वेचणी करावी लागत आहे.

Agro News | यंदा हापूससाठी करावी लागणार प्रतिक्षा; पावसामुळे मोहर प्रक्रिया लांबणीवर

परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

तर यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली असून शेतकऱ्यांनी वखरणी, खुरापणी, औषधांची फवारणी, खतांचा ढोस या पिकांना दिला आहे. त्यामुळे पिके चांगली आली होती. परंतु परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. यामधून वाचलेली पिके एकाच वेळी काढणीला आल्यामुळे कापूस वेचणीला मजूर मिळणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक शेतामध्ये कापूस वेचणी अभावी तसाच पडला असून कापूस वेचणीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.

कापसाचे पीक यंदा शेतकऱ्यांसाठी आर्थिक अडचणीचे

दरम्यान, शेतकऱ्यांना कापूस वेचणीकरिता बाहेरगावातून मजूर आणावे लागत असून मजुरांना प्रती किलो 10 रुपये असा दर द्यावा लागत आहे. मजुरीचे दरही दिवसेंदिवस वाढत असून एक क्विंटल कापसासाठी एक हजार रुपये मजुरी द्यावी लागत आहे. शिवाय ने-आण करण्याकरिता वाहन द्यावे लागत असल्यामुळे कापसाचे पीक यंदा शेतकऱ्यांसाठी आर्थिक अडचणीचे ठरत आहे.

Agro News | ऐन दिवाळसणात भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादकांना फटका; द्यावी लागतेय दुप्पट मजुरी

रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच खतांचे दर वाढले

तर रब्बीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच रासायनिक खतांचे दर वाढले असून प्रति पोत्यामागे सरासरी 100 ते 177 रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र शासनाने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्यामुळे किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. (Agro News)