Agro News | दिवाळ सणामुळे बाजार समित्या बंद; सोयाबिन विक्रीसाठी शेतकरी प्रतिक्षेत


Agro News | दिवाळी सण तोंडावर आला असून सोयाबीन हंगाम शिगेला पोहोचला आहे. त्यातच रब्बीची लगबग सुरू झाली असून या परिस्थितीत शेतकरी सध्या व्यस्त झाला आहे. दिवाळी सणामुळे आता बहुतांश बाजार समिती थेट 4 नोव्हेंबरला सुरू होणार असल्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी आता आठवडाभर बाजार उघडण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

Agro News | राहता बाजार समितीत कांद्याला काय मिळाला भाव? वाचा सविस्तर

बाजार समित्यांमध्ये सोयाबीन आवकेत वाढ

सोयाबीन हंगाम सध्या शिगेवर असताना सोयाबीन काढणे तसेच सोयाबीन विक्रीसाठी लगबग सुरू आहे. दिवाळी सणामुळे शेतकरी शेतीमाल विक्रीला प्राधान्य देत असून दिवाळी सोबतच रब्बीच्या तयारीसाठी पैशांची तजवीज म्हणून बाजारात सोयाबीन विक्रीला काढले जात आहे. मागील आठवडाभर या भागातील सर्वच बाजार समितीमध्ये सोयाबीनची दररोज हजारो क्विंटल आवक सुरू झाली होती. अकोल्यात पाच हजार क्विंटलवर आवक पोहोचली होती. तर वाशिम, मुर्तीजापुर, कारंजा, चिखली, मलकापूर, मेहकर, खामगाव अशा सर्वच महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये आवकेने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली होती. त्यातच मंगळवारपासून दिवाळी सणामुळे बाजार समित्या 3 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी खेडा खरेदीवर अवलंबून राहण्याखेरीस पर्याय राहिलेला नाही. सलग पाच ते सहा दिवस बाजार बंदीमुळे सोयाबीन विक्रीत अडचणी तयार होणार असून खेडा खरेदीत ओल्या सोयाबीनला अवघ्या 3 हजारांपासून दर दिला जात आहे.

नाफेड खरेदीला फारसा प्रतिसाद नाही

एकीकडे सोयाबीनला हमीभाव पेक्षा कमी दर मिळत असल्याची वस्तुस्थिती असून दुसरीकडे शासनाने सुरू केलेल्या नाफेड खरेदीला निकषामुळे प्रतिसाद मिळत नाहीये. शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली असूनही खरेदीसाठी निकषात बसणारा माल मिळेल असा आहे. बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाने 13 तालुके व काही मोठ्या गावांमध्ये एकूण 16 केंद्रांना मंजुरी दिली. परंतु कुठेही माल विक्रीसाठी आलेला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

Agro News | या वर्षी कापुस उत्पादनात ७ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता

तर दिवाळीच्या पर्वानंतर या केंद्रावर सोयाबीन विक्रीला येईल अशी अपेक्षा असून निकशानुसार, सोयाबीनमध्ये 12 टक्क्यांचा ओलावा अपेक्षित आहे. मात्र सध्या सोयाबीनमध्ये सुमारे 15 ते 16 टक्क्यांवर आद्रता असल्याने हा मला नाफेडच्या खरेदीने कशात बसत नाही. अकोला जिल्ह्यात देखील एक दोन केंद्रांवर झालेला मुहूर्त वगळता सोयाबीन खरेदी सुरू झालेली नाही. तर खरेदी केंद्र संचालक निकषात बसेल अशा सोयाबीनच्या विक्रीला येण्याची प्रतीक्षा करीत आहेत. (Agro News)