Agro News | राज्य सरकारला दहा वर्षानंतर आली जाग; आपदग्रस्त फळबागांच्या व्याजमाफीसाठी पंचनाम्याची अट वगळली


Agro News | राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित पीक विमा, व्याज, अनुदान योजनांसाठी निधीचे वितरण असे अनेक निर्णय घेतले असून, त्यातच सरकारने तब्बल 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त फळबागांना व्याजमाफी देण्यासाठी पंचनाम्याची अट वगळली आहे. या शेतकऱ्यांना या व्याजमाफीसाठी तब्बल 10 वर्षांपर्यंत वाट पाहावी लागली असून निवडणुकीच्या तोंडावर सरकारला हे शहाणपण सुचले आहे.

Agro News | राज्यसरकारकडून 84 साखर कारखान्यांना 14 कोटींचे व्याज अनुदान मंजूर

55 लाख 82 हजार रुपयांची व्याजमाफी

फेब्रुवारी आणि मार्च 2015 मध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना 3 महिन्यांची व्याजमाफीची रक्कम पंचनामे उपलब्ध असण्याच्या अटीवर शासनाकडून, देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही अट विचारात घेत रत्नागिरी जिल्ह्यातील 652 पात्र खातेदारांना 55 लाख 82 हजार रुपयांची व्याजमाफी देण्यात आली आहे.

Agro News | परतीच्या पावसामुळे रब्बीच्या पेरणीवर संक्रांत; ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता

राज्य सरकारने व्याजमाफीसाठी पंचनामाची अट वगळण्याचा निर्णय

निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये रत्नागिरीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे आंबा बागायतीचे 24 हजार 744 हेक्टर आणि काजू बागायतीचे 13 हजार 543.65 हेक्टर असे एकूण 87 हजार 361 शेतकऱ्यांचे एकूण 38 हजार 287.69 हेक्टर क्षेत्राचे 50 % पेक्षा जास्त नुकसान झाले होते. तर शासनाने घेतलेल्या व्याजमाफीच्या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना पंचनाम्या विना मिळणार नव्हता. परंतु, फळबागांचे नुकसान झालेल्या या कर्जदार शेतकऱ्यांना व्याजामाफीचा लाभ मिळणे आवश्यक होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 87,361 शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने व्याजमाफीसाठी पंचनामाची अट वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, केवळ 3 महिन्यांच्या व्याजमाफीची रक्कम अदा करण्यासाठी पंचनामाची अट वगळण्यात आली आहे. तर ही सूट इतर प्रकरणी पुर्वादाहरण म्हणून मानण्यात येणार नाही. असे देखील सरकारने स्पष्ट केले आहे. (Agro News)