Agro News | अति मुसळधार पावसामुळे सुपारी बागायतदार चिंतेत; पिकावर रोगराई पडण्याची भीती


Agro News | सध्या खरिपातील भात पिके बहरली असून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हाता-तोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये आहे. रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सुपारी बागातदारांनी पावसाची धास्ती घेतली असून असाच पाऊस सुरू राहिल्यास पिकावर रोगराई पडण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. आग्राव रस्ता, चौल नाका, मुरूड तालुक्यातील साळावगाव-चोरडा या राज्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात 5 दिवस सतत झालेल्या वादळी पावसाने संध्याकाळी गोवे गावातील 8 घरांवर वीज पडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत एका महिलेसह 13 वर्षीय मुलगा किरकोळ जखमी झाला असून घरातील विद्युत उपकरणे नादुरुस्त झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Agro News | सोयाबीन ने केले नाराज, शेतकरी कापसाच्या आशेवर; मजूर मिळत नसल्याने कामात व्यत्यय

घरावर वीज पडल्याने नुकसान

कोलाड परिसरात शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दीड ते दोन तास पावसाने जोरदार हजेरी लावली. ज्यात मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या गोवे गावातील विजय जवके, मारुती निकम, विश्वास निकम, यशवंत सुतार, कमलाकर सुर्वे, दिलीप आंबेकर, अविनाश आंबेकर यांच्या घरांवर अचानक वीज पडली. ज्यामध्ये त्यांच्या घरातील विद्युत उपकरणे, विद्युत बोर्ड व वायरिंग पूर्णतः जळाली असून टीव्ही, फ्रीज, अन्य वस्तू नादुरुस्त झाले आहेत.

Agro News | सणांमुळे झेंडूच्या दरात वाढ

बस स्थानकात शिरले पाणी

या वादळी पावसामुळे विजय जवके यांच्या घराच्या काही भागाचे पत्रे तुटले असून दिलीप आंबेकर यांच्या घरावर वीज पडल्याने महिला व एक मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत. तर सकल भागात काही ठिकाणी पाणी साचले होते. या पावसाने अवघ्या काही महिन्यांपूर्वी भरलेले खड्डे पुन्हा उघडल्याने कामाच्या दर्जावरून नागरिकांकडून बांधकाम विभागावर संताप व्यक्त केला जात आहे. पाली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या तासाभरात रविवारी संध्याकाळी अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या भागात बस स्थानकात पाणी शिकल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोयी झाली.