Agro News | पावसामुळे सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कपाशीकडून आशा लावली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना आता कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी मजुरी जास्त द्यावी लागत आहे. आगर परिसरात कापूस वेचणीला सुरुवात झाली असून सर्वत्र सीता दही केल्या जात आहेत. दुसरीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता कापसाला किती भाव मिळतो? याकडे लागून राहिले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला सततच्या पावसाने जोरदार फटका बसलाअसून शेतीला लावलेला खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
Agro News | ऐन सणासुदीला नाशकात अवकाळीमुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांवर दुबार रोपनिर्मितीची वेळ
शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या आशेवर
त्याच्यावरची अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले. ज्यामुळे काढणीचा खर्च वाढला असून उताराही कमी लागत आहे. सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर यंदा कपाशीचे पीक जोरदार असल्याने आता शेतकऱ्यांना याच पिकाकडून अपेक्षा आहे. तर योग्य भाव मिळाला तर सोयाबीनची कमतरता भरून निघेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. गेवराई तालुक्यात सध्या कपाशीचे पीक चांगले आले असून वेचणीला सुरुवात झाली. परंतु कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना मजूर शोधण्याची वेळ आली आहे. त्यात महिला मजुरांना ने-आण करण्याकरिता रिक्षा लावून व 11 रुपये किलो दराने वेचणीची मजुरी द्यावी लागते आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
पावसामुळे सोयाबीनचे नुकसान
जुलै महिन्यामध्ये झालेल्या पावसाने दोन महिने उघडीप दिली नसल्याकारणाने शेतात पिकापेक्षा तण अधिक वाढले होते. तर सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करून तणाचा बंदोबस्त केला. असे असताना देखील सोयाबीन पिकाला फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे यंदा खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती सोयाबीन पिकाची झाली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आंतरपीक असलेल्या तुर पिकावर आशा असून कापूस वेचणीला सध्या प्रारंभ झाला आहे. सीता दहीसाठी 300 रुपये प्रमाणे मजुरीचे दर द्यावे लागत असल्याने कापसाला बाजारात भाव काय मिळणार याकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
Agro News | सणांमुळे झेंडूच्या दरात वाढ
मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त
गेवराई तालुक्यामधील तेरा महसूल मंडळातमध्ये यावर्षी चांगला पाऊस पडला. त्यामुळे पिके जोरदार आली होती. सप्टेंबरमधील पावसामुळे कापूस पिकाचे नुकसान झाले. त्यातच आता कापसाची वेचणी सुरू झाली आहे. तर वेचणीला मजूर महिलांना गावोगावी फिरावे लागत असल्यामुळे मजूर महिला मिळणे कठीण झाले आहे. मजूर महिलेला 11 रुपये किलो दराप्रमाणे वेचणीची मजुरी देऊन तसेच त्यांची ने-आण करण्याकरिता रिक्षा वाहनांची सोय करून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मजूर आणण्यासाठी गावोगावी फिरण्याची वेळ आली आहे. (Agro News)