Agro News | तुर आणि हरभऱ्याच्या किमतीत घट तर कोरड्या हवामानामुळे यावर्षी आवक लवकर सुरू


Agro News | दिनांक 5 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत कापूस, मका, सोयाबीन, कांदा या पिकांची आवक सुरू झाली असून ऑक्टोबर मधील कोरड्या हवामानामुळे यावर्षी आवक लवकर सुरू झाली आहे. खरीप व रब्बी दोन्ही पिकांचे उत्पादन यावर्षी चांगले होण्याची शक्यता असल्याने हमीभावाचा आधार घेण्याची आवश्यकता वाढणार आहे. या आठवड्यात टोमॅटो वगळता सर्वच पिकाचे भाव घसरले असून तुरीच्या भावातक्षणीय घट झाली आहे. सध्या तूर 9000 रु.च्या खाली आली आहे. तर सोयाबीनचे भाव जवळपास स्थिर आहेत.

Agro News | आसमानी संकटामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम; शेतकरी चिंतेत

गेल्या आठवड्यातील बाजार दर पुढीलप्रमाणे:

कापूस

गेल्या आठवड्यात MCX मधील कापसाचे सॉफ्ट भाव राजकोट, यवतमाळ, जालना या भागात 1.8 टक्क्याने घसरून 57,820 वर आले होते. तर या सप्ताह ते पुन्हा 2.5 टक्क्यांनी घसरून 56 हजार 400 वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स भाव 0.4 टक्क्यांनी घसरून 57 हजारांवर आले आहेत. तर जानेवारी फ्युचर्स भाव 57 हजार 700 रु. आहेत. हे सॉफ्ट भावापेक्षा 2.5 टक्क्यांनी अधिक असून भविष्यात कापसाचे भाव कमी होतील असा अंदाज या भावातून दिसून येत आहे. तर कापसाची आवक वाढू लागली आहे. तर या आठवड्यात NCDEX मधील कपाशीचे सॉफ्ट भाव 2.2 टक्क्यांनी घसरून 1,587 वर आले आहेत. तर एप्रिल फ्युचर्स 1,580 वर आले असून ते सॉफ्ट भावापेक्षा 2.1 टक्क्यानी जास्त आहे. कापसाचे हमीभाव मध्यम भागासाठी 7,121 प्रतिक्विंटल व लांब धाग्यासाठी 7,521 असे आहेत. एप्रिल फ्युचर्स हमीभावापेक्षा 76 रुपयांनी जास्त आहे.

मका

या आठवड्यात NCDEX मधील खरीप मक्याच्या सॉफ्ट किमती 3 टक्क्यांनी घसरून 2,450 वर आले आहेत. नोव्हेंबर फीचर्स किमती 2,470 वर आल्यास वर जानेवारी फ्युचर 2,499 वर आहेत. सॉफ्ट भावापेक्षा हा भाव 2 टक्क्यांनी अधिक असून मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही. मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे लागणार आहे. मक्याचा हमीभाव 2,225 असा असून सध्याचे सॉफ्ट व फ्युचर भाव हमीभावा पेक्षा अधिक आहेत.

हळद

या महिन्यात NCDEX मध्ये हळदीसाठी ऑक्टोबर व डिसेंबर डिलिव्हरी व्यवहार सुरू आहेत. NCDEX मधील हळदीच्या सॉफ्ट किमती मागील आठवड्यात 14,240 वर आल्या होत्या. तर या आठवड्यात त्या 0.6% ने घसरून 14,154 आले आहेत. तर डिसेंबर फ्युचर किमती 4.1% ने घसरून 13,574 वर आल्या आहेत. एप्रिल किमती 14,220 वर आल्या असून हमीभावापेक्षा त्या 0.5 टक्क्याने अधिक आहेत.

हरभरा

मागील आठवड्यात हरभऱ्याच्या सॉफ्ट किमती 3.8 टक्क्यांनी घसरून 700 वर आल्या होत्या. तर या आढवड्यात त्या पुन्हा 3.9 टक्क्यांनी घसरून 7400 वर आल्या आहेत. मूगमुगाची सॉफ्ट किंमत 1.3 टक्क्याने घसरून 7,900 वर आली असून मुगाचा हमीभाव 8,682 रुपयांवर आला आहे.

मूग

मुगाची सॉफ्ट किंमत 1.3 टक्क्यांनी घसरली असून 7,900 रुपयांवर आली आहे. तर मुगाचा हमीभाव 8,682 रुपयांवर आहे. सोयाबीनया आठवड्यात सोयाबीनची सॉफ्ट किंमत 4,671 रुपयांवर आली आहे. तर सोयाबीनचा हमीभाव 4,892 रुपयांवर आला असून नवीन पिकाच्या आवक सुरू झाली आहे.

तूर

मागील आठवड्यात तुरीची सॉफ्ट किंमत 1.3 टक्क्यांनी घसरून 9,795 आली होती. तर या आठवड्यात ती 8.2 टक्क्यांनी घसरून 8,994 आली आहे. तुरीचा हमीभाव 7,750 रुपयांवर आला आहे. तर नवीन पिकाची आवक जानेवारी अखेरी पासून होणार आहे.

कांदा

मागच्या आठवड्यात कांद्याची सरासरी 4,330 रुपयांची होती, तर या आठवड्यात ती 4,338 वर आली आहे. नवीन पिकाची आवक आता सुरू झाली आहे.

Agro News | पालघर जिल्ह्यात नाचणीची कणसं बहरली; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

टोमॅटो

मागच्या आठवड्यात टोमॅटोची सॉफ्ट किंमत 4,500 रुपयांवर आली होती. तर या आठवड्यात ती वाढवून 4,750 रुपयांवर आली असून आवकेत उतरता कल दिसून येतोय. (Agro News)