Agro News | आसमानी संकटामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम; शेतकरी चिंतेत


Agro News | हवामानात दिवसेंदिवस होणारे बदल आणि किड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन उत्पादक भरमसाठ उत्पादन खर्चामुळे आर्थिक कोंडीत सापडला आहे. सोयाबीन कापणी व मळणीच्या कामासाठी लगबग सुरू केली असून मळणी आटोपल्यानंतर सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घसरण पहायला मिळाली असून यामुळे सोयाबीन उत्पादक आसमानी संकटात सापडला आहे. त्यात बाजार भाव योग्य मिळत नसल्यामुळे देखील दुहेरी पंचायत होण्याची शक्यता आहे.

Agro News | पालघर जिल्ह्यात नाचणीची कणसं बहरली; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

सोयाबीन आणि कापूस पिकांना फटका

राज्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीन व कपाशी या दोन पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याचबरोबर कापूस पिकाचे देखील हाल होत असून कपाशीची योग्य वाढ नं झाल्याने आणि विविध कीड रोगांमुळे कपाशीच्या उत्पादनात फारसा नफा मिळणार नसल्याकारणाने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. त्यातच फुलांवर आणि कापणीवर आलेले सोयाबीन संततधार व मुसळधार पावसामुळे शेंगा झाडावरच सडल्या आहेत. तर अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या शेंगांना बुरशी लागल्याचा प्रकारही पहायला मिळत आहे. पावसामुळे सोयाबीन पीकही चिखलात लोळले असून मधल्या कालखंडात मुळकुज, खोडमाशी या कीड रोगांनी सोयाबीनला उध्वस्त केले. पावसामुळे अनेकांना केर-कचरा, झाडांची निगा राखणे, फवारणी करणे कठीण झाले होते. यामुळे संपूर्ण निसर्गाच्या असमतोलपणाचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. तेव्हा शासनाने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Agro News | यंदा खरीप हंगामात सरासरी पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी

सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम

सोयाबीनची मळणी करणाऱ्या शेतकऱ्यांना माळणेचा खर्च परवडणारा नसून, सोयाबीनचा दाणा बारीक तर सडका निघत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. याशिवाय असंख्य शेतकऱ्यांना यलो मोझेंक व्हायरसने त्रस्त केले असून वारंवार उद्भवणाऱ्या संकटामुळे सलग नुकसान झाले असल्याने सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. (Agro News)