Agro News | शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने सोयाबीन विक्रीसाठी नाव नोंदणी करता मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी आता 30 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी करू शकतात. तसेच वाई येथील खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली असून त्यामुळे जिल्ह्यात सहा खरेदी केंद्र झाली आहेत. अशी माहिती जिल्हा उपन निबंध संजय कुमार सुद्रिक यांनी दिली आहे.
Agro News | कृषी विभागाकडून पिक विमा योजनेतील घोटाळे उघडकीस; बोगस अर्जांची फेर तपासणी सुरू
सातारा जिल्ह्यात सोयाबीन सहा खरेदी केंद्रे झाली आहेत.
2024-25 या वर्षासाठी शासनाने सोयाबीनला निश्चित केलेल्या आधारभूत किमतीत म्हणजेच, प्रतिक्विंटल 4,892 रुपयांनी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघामार्फत केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये फलटण, कोरेगाव, सातारा, कराड येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघांना तसेच मसूरला विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे केंद्र सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच आता वाई येथे नव्याने केंद्र सुरू करण्यासाठी खरेदी विक्री संघास मान्यता मिळाली असून सातारा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्राची संख्या सहा झाली आहे. कोरेगाव व मसूर येथील केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदीस सुरुवात झाली आहे.
आत्तापर्यंत इतक्या शेतकऱ्यांनी केली नाव नोंदणी
कोरेगाव केंद्रावर आत्तापर्यंत 111 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 128 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. तसेच मसूर केंद्रावर 29 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 6 शेतकऱ्यांच्या 64 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. साताऱ्यातही 45 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर फलटण येथे 78 व कराडला 5 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
Agro News | मॉन्सूनोत्तर पावसामुळे पांढऱ्या कांद्याची लागवड लांबणीवर
नवीन केंद्रावर शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य
दरम्यान, वाई येथील नवीन केंद्रावर शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी होताच, प्रत्यक्ष खरेदी सुरुवात होणार असून शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य जिल्ह्यातील सहाही खरेदी केंद्रांवर सोयाबीन आधारभूत किमतीने खरेदी करण्यात येणार आहे. याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून ऑनलाईन नोंदणीची वाढीव मुदत 15 नोव्हेंबरला संपणार होती. परंतु अद्यापही इच्छुक शेतकऱ्यांची नोंदणी झाली नसल्याकारणाने 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Agro News)