Agro News | नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मका व सोयाबीन मालाची हमीभावाने खरेदी होण्यासाठी शासन स्तरावरून किमान आधारभूत खरेदी-केंद्र चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सुरू करावीत अशी मागणी सभापती संजय जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
Agro News | खाद्यतेल-तेलबियांच्या राष्ट्रीय मिशनला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
अपेक्षाप्रमाणे हमीभाव नाही
तहसीलदार बाबासाहेब खेडकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून निवेदनात तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा, मका, सोयाबीन इत्यादी शेतमालाचे उत्पादन घेतले आहे. बी-बियाणे रासायनिक खते, मजूर, जीएसटीमुळे उत्पादन खर्च वाढला असून शेतीमालाला रास्त भाव मिळणे आवश्यक आहे. परंतु उत्पादनापेक्षा कमी बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या तालुक्यात मका, सोयाबीनचा हंगाम सुरू असून कर्ज परतफेडीसाठी मालाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे.
2024-25 साठी केंद्राने मका या शेतीमालाला 225 व सोयाबीनला 4 हजार 892 दराने हमीभाव जाहीर केला असून केंद्राने जाहीर केलेले हे हमीभाव उत्पादन खर्चाला आधारित नाहीत. त्यामुळे किमान आधारभूत खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडे करण्यात आली आहे.
Agro News | टोमॅटोच्या आवाकीत घट; व्यापारी मालाच्या प्रतीक्षेत
ऑनलाइन नोंदणी बाबत कार्यक्रम राबवावे
केंद्राकडून हमीभावाने शेतीमाल विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी ॲप सुरू केले आहे परंतु याची माहिती शेतकऱ्यांना नसते, त्यामुळे ऑनलाइन नोंदणी बाबत कार्यक्रम राबवावेत अशी मागणी देखील सभापती संजय जाधव, समाधान जामदार, गोरक्षनाथ रकीबे, सागर जाधव, भगवान जाधव यांनी केली आहे. (Agro News)