Agro News | जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून 237 कोटी, 7 लाख 13 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय शासनाने जारी केला असून संबंधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल अशी माहिती मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.
Agro News | सोयातेलासाठी सोयाबीनच्या गाळपित वाढ; भावदरांवर परीणाम होणार?
आपत्ती बाधित नागरिकांना मदत देण्याचे धोरण
अनिल पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात, एका वेळेस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येते. त्याचप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. केंद्रशासनाने विहित केलेल्या नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, आकस्मिक आग लागणे या आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच सततचा पाऊस ही देखील नैसर्गिक आपत्ती घोषित केली आहे.
ते पुढे म्हणाले, “जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानग्रस्तांना मदत देण्यासंबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनाला प्राप्त झाले होते. त्यानुसार, शेतपीकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता 237 कोटी 7 लाख 13 हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Agro News | खानदेशात पावसामुळे पीकहानी थांबेना; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
अशाप्रकारे केले आहे निधीचे वितरण
यामध्ये वर्धा जिल्ह्यासाठी ३६९१.७६ लक्ष, गडचिरोली जिल्ह्यासाठी ५७७२.४२ लक्ष, पुणे जिल्ह्यासाठी ४५८.७१ लक्ष, नागपूर जिल्ह्यासाठी १८३६.५६ लक्ष, चंद्रपूर जिल्ह्यासाठी ७४२९.२२ लक्ष, सातारा जिल्ह्यासाठी ८४.८६ लक्ष, अमरावती जिल्ह्यासाठी ५१.०१ लक्ष, सांगली जिल्ह्यासाठी १११३.२५ लक्ष, यवतमाळ जिल्ह्यासाठी ५४७.९६ लक्ष, बुलढाणा जिल्ह्यासाठी १३५८.६६ लक्ष, वाशिम जिल्ह्यासाठी ७२.५५ लक्ष, अकोला जिल्ह्यासाठी १२९०.१७ लक्ष, अशाप्रकारे 237 कोटी 7 लाख 13 हजार इतका निधी वितरी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (State Government)