Weather Update | उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला असून उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवत आहे. निफाड व धुळे येथे किमान तापमानाचा 11 अंशाच्या खाली घसरला असून आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी तापमानातील घट कायम राहणार आहे. तर राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Weather Forecast | उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी; पुण्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद
किमान तापमानात घट कायम
भारत व श्रीलंकेदरम्यान असलेल्या कोमोरीन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. देशाच्या उत्तरेकडील भागात थंडी कमी-अधिक होत आहे. बुधवार दिनांक 20 रोजी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील सर्वात नीचांकी म्हणजेच 10.3 अंश तापमानाची नोंद झाली. तसेच अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 15 अंशाच्या खाली घसरला होता. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 35 अंश तापमानाची नोंद झाली. तसेच आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी किमान तापमानात घट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Weather News | राज्यात थंडीने पुन्हा जोर धरला
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र तीव्र
तर दक्षिण अंदमान समुद्रात आज चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज असून या प्रणालीच्या प्रभावामुळे शनिवार पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रणालीची तीव्रता वायव्य व उत्तरेकडे सरकताना वाढण्याचे संकेत हवामान विभागाने वर्तवला आहे. (Weather Update)