Onion News | कांद्याचे दर अजून किती दिवस तग धरणार?


Onion News | देशात सध्या कांद्याच्या भावात चढ-उतार होत असून कांद्याची सरासरी दर 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. यातच खरिपातील कांद्याची आवक अजून वाढली नसून लेट खरिपातील लागवड घटल्यामुळे कांद्याचे बाजार भाव आणखीन काही आठवडे टिकण्याचा अंदाज आहे.

Onion Rate | दर स्थिरीकरणासाठी केंद्राकडून बफर स्टॉकमधील कांदा बाजारात

पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाल्याने आवक मंदावली

आवकेत घट झाल्यामुळे देशातील बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव वाढले असून सध्या देशात उपलब्ध कांद्याचे प्रमाण फार कमी आहे. सध्या देशातील बाजारात उपलब्ध कांद्याचे प्रमाण फारच कमी असून रब्बी व खरीप असे कांदा आवकेचे गणित असते. यंदा खरिपातील कांदा लागवड वाढली असली तरी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच लेट खरिपातील कांदा लागवडीत ही घट झाली आहे. तर खरिपातील कांदा लागवड साधारणपणे जून व जुलै महिन्यात होत असते. त्याची काढणे ऑक्टोबर पासून सुरू होते. परंतु यंदा जून आणि जुलै रोप लावण्यासाठी अनेक भागांमध्ये उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे लागवड उशिरा सुरू झाली. तर लेट खरिपाची लागवड सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात होत असून त्याची काढणी डिसेंबरनंतर होते. तर रब्बीची लागवड डिसेंबरनंतर होते. व काढणी मार्चपासून सुरू होते.

लेट खरीपाच्या लागवड क्षेत्रात घट

मागील हंगामात खरीपात 2 लाख 85 हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. परंतु यंदा लागवड वाढवून 3 लाख 82 हजार हेक्टर वर पोहोचली. त्यामुळे लागवड क्षेत्र जवळपास एक लाख हेक्टरने वाढले होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. खरीपातील लागवड वाढली असली, तरी लेट खरीपाची लागवड कमी झाली आहे. शिवाय गेल्या हंगामात लेट खरीपाची 1 लाख 66 हजार हेक्टर वर लागवड झाली होती. मात्र यंदा 55 हजार हेक्टर एवढीच लागवड झाली आहे.

Onion Rate | आज राज्यात 1 लाख क्विंटल कांद्याची आवक; काय मिळाला दर..? वाचा सविस्तर!

येत्या आठवड्यांमध्ये खरीपाची आवक वाढणार

गेल्या रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन घटल्याने यंदा बाजारातील आवक. यामुळे सध्या रब्बीतील कांदा उपलब्धता कमी असून खरीपातील कांदा उशिरा येत आहे. ज्यामुळे बाजारात सध्या कांद्याची उपलब्धता कमी राहणार असून पुढील काही आठवड्यांमध्ये खरिपातील कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात होईल अशी स्थिती आहे. (Onion News)