Weather Forecast | उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी; पुण्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद


Weather Forecast | राज्यात तापमानात कमालीची घट झाली असून गारठा वाढला आहे. पुण्यात हंगामातील सर्वात कमी म्हणजेच 12.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर येत्या काही दिवसात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली असून धुळे आणि निफाड येथे किमान तापमानाचा पारा 11 अंशाच्या खाली घसरला आहे. तर आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी तापमानातील घट कायम राहणार आहे.

Weather News | राज्यात थंडीने पुन्हा जोर धरला

कमी दाबाच्या क्षेत्राची तीर्वता वाढणार

तमिळनाडू आणि कोमोरिन भाग परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून दक्षिण अंदमान समुद्रात उद्यापर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे शनिवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढला असून मंगळवारी राजस्थानतील सिकार येथे 7 पूर्णांक 2 अंश सेल्सिअस या नीचांकी तापमानाची नोंद झाली.

Weather Forecast | आज राज्याच्या किमान तापमानात घट; गारठा वाढणार

तापमानात आणखीन घट होण्याची शक्यता

तर मंगळवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात 10 पूर्णांक 8 अंश नीचांकी तापमान नोंदवले गेले. तर निफाड मत येथील गहू संशोधन केंद्रात 10.9 अंश तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी किमान तापमान 15 अंशाखाली घसरले असून राज्यात गारठा वाढला आहे. तर सांताक्रुज येथे 36 अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. तसेच आज किमान तापमानात घट कायम राहणार असून गारठा वाढण्याचा अंदाज आहे. (Weather Forecast)