Agro News | यंदा परतीचा पावसाने पिकाकडून असलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांवरती पाणी फेरले असून रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात पिकाला मोठा फटका बसला, असतानाच आता पांढऱ्या कांद्यालाही या पावसामुळे फटका बसत आहे. परतीच्या पावसामुळे शेतजमीन ओली असल्याने या पिकाची लागवड खोळंबली असून लागवड डिसेंबर पासून सुरू होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Agro News | वाढत्या महागाईत चोरट्यांचा लसणावर डल्ला; पंचवटी बाजारातून साडेतीन लाखांचा माल चोरीला
पांढऱ्या कांद्याची राज्यसह देशात प्रचंड मागणी
पांढऱ्या कांद्याची औषधी कांदा अशी ओळख असून तालुक्यात सुमारे 250 पेक्षा अधिक हेक्टर वर या पिकाचे क्षेत्र घेतले जाते. एक हजाराहून अधिक शेतकरी याचे उत्पादक आहेत. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची पांढरे सोने अशी ही ओळख आहे. वाडगाव, कारले, खंडाळे, सागाव, तळवली, नेहुली अशा अनेक भागात या कांद्याची लागवड केली जात असून अलीबागच्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. अलिबागच्या पिकाला मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच देशांमध्ये प्रचंड मागणी आहे.
यावर्षी कृषी विभागाने बियाणे वाढीसाठी प्रयत्न केले असून त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे यावर्षी पांढरा कांदा लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. तर पांढऱ्या कांद्याची लागवड प्रक्रिया दोन-अडीच महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होते. कांदा तयार झाल्यावर शेतातून काढणे, सुकवणे, त्याच्या माळी तयार करणे, बाजारात विकण्यासाठी पाठविणे. अशी अनेक प्रकारची कामे असतात त्यामुळे महिलांना या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो.
Agro News | व्यापाऱ्याने पैसे रखडवले; संतप्त शेतकऱ्यांचे लासलगाव बाजार समिती बाहेर आंदोलन
जमिनीत ओलावा असल्यामुळे लागवड खोळंबली
यावर्षी भात शेतीला पोषक असे वातावरण मिळाले असले तरी, परतीच्या पावसामुळे भात शेतीला मोठ्या प्रमाणात फटका देखील बसला आहे. पांढऱ्या कांद्याला त्याची झळ पोहोचली असल्याची चिंता ही आता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. परतीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा असल्यामुळे रोप तयार होण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. (Agro News)