Weather News | उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम; आज कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा


Weather News | राज्याच्या उत्तरेकडील भागात तापमानात घट कायम असून थंडीचा कडाका वाढला आहे. तर उर्वरित राज्यात देखील तापमानाचा पारा घसरला आहे. दरम्यान, दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ वातावरण असून आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामान, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार कायम आहे.

Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात गाराठा वाढला; कोकणात मात्र थंडीची प्रतीक्षा कायम

राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानात घट

दक्षिण तमिळनाडू परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून आग्नेय अरबी समुद्रात लक्षदीप बेटाजवळ आणखीन एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडीची चाहूल लागली. गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी धुळ्यात राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली असून निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 11 पूर्णांक 6 अंश तापमान नोंदवले गेले आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात देखील किमान तापमान 15° च्या खाली आले आहे.

Weather Forecast | आज राज्यात विजांसह पावसाचा इशारा!; तापमानात चढ-उतार कायम

आज ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

राज्यात थंडीची चाहूल लागली असली तरी कोकणात मात्र अजूनही तापमान 35 अंशाच्या पुढे आहे. गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सांताक्रुज येथे राज्यातील उच्चांकी 36.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रात गाराठा कायम राहणार असून सिंधुदुर्ग रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये वादळ वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे, सोलापूर, रायगड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather News)