Agro News | यंदा हापूससाठी करावी लागणार प्रतिक्षा; पावसामुळे मोहर प्रक्रिया लांबणीवर


Agro News | दरवर्षी कोकणातील रायगड येथील हापूस मोठ्या प्रमाणात बाजारात येत असतो. परंतु यावर्षी पावसाने उशिरापर्यंत तग धरल्यामुळे हापूससाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर पावसाने जमिनीत ओलाव असल्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे.

Agro News | हमीभावापेक्षा 500 ते 700 रुपयांनी कमी भाव मिळत असल्यामुळे सोयाबीन उत्पादकांमध्ये नाराजी

मोहरासाठी महिनाभर वाट पाहावी लागणार

यावर्षी मोहराची प्रक्रिया उशिराने होणार असून आंबा हंगाम लांबणीवर पडणार आहे. जिल्ह्यात एकूण 14 हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये उत्पादनक्षम क्षेत्र 12,500 हेक्टर वर आहे. गेल्या आठवड्यापर्यंत पडलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा नष्ट होतो व नोव्हेंबर पासून थंडी सुरू झाल्यावर मुळांना ताण बसून मोहराची प्रक्रिया सुरू होते. परंतु दिवाळी सुरू झाली असली तरी अद्याप थंडीची चाहूल लागली नसल्याने हापूससाठी यावर्षी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.

Agro News | ऐन दिवाळसणात भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादकांना फटका; द्यावी लागतेय दुप्पट मजुरी

पहिल्या टप्प्यातील आंब्याची पेटी मार्च-एप्रिल महिन्यात येण्याची शक्यता

पावसामुळे जमिनीत ओलावा असल्यामुळे कलमांना पालवी सुरू झाली आहे. जुनी पानगळ होऊन नवीन पाने येत आहेत. पालवी जीर्ण होण्यासाठी किमान दीड ते दोन महिने कालावधी लागतो. त्यानंतर मोहन प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मोहर प्रक्रियेनंतर खऱ्या अर्थाने आंबा हंगामाला सुरुवात होते. तर नोव्हेंबर मध्ये मोहर आल्यास फेब्रुवारीपर्यंत पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात येण्याची शक्यता असते. पण मोहर उशिरा आल्यास पहिल्या टप्प्यातील आंबा मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. तर मागील व दोन वर्षे ऑक्टोबर हिटचे परिणाम चांगले राहिल्यामुळे नोव्हेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात मोहर आला होता. यावर्षी मात्र या प्रक्रियेस विलंब होणार आहे. (Agro News)