Weather Update | अखेर राज्यामध्ये थंडीची प्रतिक्षा संपली असून अनेक भागांमध्ये आता गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, सांगली, नाशिक, जळगाव, नागपूर आदि जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होत असून गेल्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यात सकाळी व रात्रीच्या वेळी थंडी जाणवू लागली आहे. तर आज गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी पुण्यात 15.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून सांगलीत राज्यातील निश्चांकी म्हणजेच 14.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. तर पुढील काही दिवसात राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Weather News | बे ऑफ बंगालच्या खाडीत सायक्लोनिक सर्क्युलेशन; राज्याच्या हवामानावर काय परिणाम होणार?
बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती
आय.एम.डीच्या अहवालानुसार, सध्या मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून तमिळनाडू व केरळच्या काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच पूर्व राजस्थान भागात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसणे घट झाली आहे. याचबरोबर जम्मू-काश्मीर, बाल्टीस्तान, राजस्थान, लडाख, मुजफ्फराबाद या ठिकाणी तापमानात फारसा बदल झालेला नाही.
पुढील आठवड्यात राज्यात हवामान कोरडे राहणार
तर राज्यात ऑक्टोबर महिन्यात उष्णतेत वाढ झाली होती. पण नोव्हेंबर उजाडला तरी तापमानात मोठी वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे सर्वांनाच थंडीच्या चाहूलीची प्रतिक्षा लागून राहिली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठी घट पाहायला मिळत असून गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील नाशिकमध्ये राज्यातील निच्चांकी तापमान नोंदवले गेले असून नाशकात 14.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच सांगली जिल्ह्यातही 14.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यामध्ये राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर तापमानात आणखीन घट पुण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात थंडीची चाहूल; आज किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता
पुण्यात तापमानात सर्वाधिक घट
तर पुण्यामध्ये आज गुरुवार दि. 7 नोव्हेंबर रोजी तापमान सर्वात मोठी घट पाहायला मिळाली असून शिवाजीनगर, डीएननगर येथे सर्वात कमी तापमान नोंदविले गेले. शिवाजीनगर मध्ये 15.2 अंश सेल्सियस तर हवेली येथे 13.4 व एनडीए येथे 13.7 तापमानाची तर वडगावशेरीत सर्वाधिक तापमान नोंदविले गेले असून येथे 21.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मगरपट्टा 20.3, कोरेगाव पार्क येथे 19.3 इतके तापमान नोंदविले गेले. तर मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढला असल्यामुळे पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील मुख्य शहरांचे नोंदविले गेलेले किमान तापमान
महाबळेश्वर – 15.6, जळगाव – 15.8, पुणे – 15.2, मालेगाव – 17.8, सातारा – 16.6, परभणी – 18.3, नागपूर – 18.6, सांगली – 14.4, अहिल्यानगर – 14.7.